Aurangabad : पारधी वस्तीवरील मुलांसोबत पोलिसांनी साजरा केला बाल दिन

आज बाल दिनानिमित्त पोलीस अधीक्षक श्रीमती मोक्षदा पाटील यांच्या संकल्पनेतून पोलीस ठाणे चिकलठाणा अंतर्गत आडगाव निपाणी येथील पारधी वस्तीवरील लहान मुलांना वह्या , गोष्टींची पुस्तके, खेळणी व खाऊचे वाटप करण्यात आले.
अनेकदा पोलीस गुन्ह्याच्या तपासामध्ये वस्तीवर चेकिंग साठी जात असतात त्यावेळी या निरागस बालमनावर परिणाम होतो त्यांच्या मनातील पोलीसांबद्दलची भीती व गैरसमज दूर व्हावा यासाठी हा एक छोटा प्रयत्न त्याचबरोबर आज बालदिन परंतु या दुर्गम भागातील वस्तीवर राहणाऱ्या मुलांना बालदिन काय असतो हेच माहिती नाही त्यांना बालदिनाचा आनंदही मिळावा हाही एक हेतू.
या उपक्रमास साठी माननीय पोलीस अधीक्षक श्रीमती मोक्षदा पाटील अपर पोलिस अधीक्षक श्री गणेश गावडे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर विशाल नेहुल यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री महेश आंधळे, NPC सोपान डकले महिला पोलीस रुक्मिणी डापकर, संतोष टिमकीकर पोलीस पाटील श्रीकांत हाके यांनी सहभाग घेतला.