Aurangabad : रस्त्यात अडथळा निर्माण करणार्या वाहन धारकांवर कारवाई, विविध पोलिस ठाण्यात २५ गुन्हे दाखल

औरंंंगाबाद : रस्यात वाहने उभी करुन रहदारीस अडथळा निर्माण करणार्या वाहनधारक व हाथगाडी चालकांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. विविध पोलिस ठाण्यात २५ जणांवर वाहतूकीस अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुंडलीक नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत रिक्षा चालक अमोल विष्णु आहेरकर, सुनिल प्रेमसिंग राठोड, सोनु मोहण भगुरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. तर एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्याच्या हद्दीत रिक्षा चालक दिलीप लक्ष्मण पवार (२७, रा. मयुरपार्क), रोहन दिलीप नवगीरे (१९, रा. न्यायनगर, पुंडलीक नगर), अहेमद खान अब्दुल्ला खान (३६, रा. बारी कॉलनी), सय्यद खलील सय्यद हबीब (२१, रा. शरिफ कॉलनी, कटकटगेट), शेख साजीद शेख आमीर (३०, रा. नारेगाव) यांच्यावर, सिडको पोलिस ठाण्याच्या हद्दीत फळाची गाडा चालविणारे मझर खान समशेद खान (२८, रा. बेरीबाग, हर्सुल), जाव्ोद बनेमिया बागवान (२४), शेख नय्यर शेख इलियास (२२, दोघे रा. चिश्तीया कॉलनी, एन-६, सिडको), एजाज खान सुभान खान (३८, रा. संजयनगर, बायजीपुरा) यांच्यावर तर मुकुंदवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत रिक्षा चालक प्रविण परमेश्वर शेडगे (रा. शांतीनिकेतन कॉलनी, जवाहर नगर), किशोर साहेबराव राठोड (२२, रा. संयजनगर, मुकुंदवाडी) या दोघांवर तसेच उस्मानपुरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत फळगाड्या लावणार्या अब्दुल अन्वर अब्दुल हमीद (५०), अक्तर अब्दुल करीम बागवान (५२, रा. दोघे रा. सब्जीमंडी, पैठणगेट), सर्जेराव किसन त्रिभुवन (६०, रा. मिलींदनगर) व रिक्षा चालक विजय देविदास दाभाडे (२७, रा. कोकणवाडी) यांच्यावर तर सातारा पोलिस ठाण्याच्या हद्दीत रिक्षा चालक विठ्ठल उत्तमराव हिरे (३८, रा. नारळीबाग), मुक्तार मलिक जाफर मलिक (४५, रा. गणेश कॉलनी), जिन्सी पोलिस ठाण्याच्या हद्दीत ट्रक चालक भरत रेतीलाल पाटील (२४, रा. नळठाणा ता. सिंद्दखेड जि. धुळे), सलीम खान अब्दुल रहेमान (२५, रा. रहीमनगर, आझाद चौक), लोडींग वाहन चालक शेख अब्दुल समद शेख अब्दुल गफुर (२४, रा. नाहीद नगर, हत्तेसिंगपुरा, कटकटगेट) तसेच जवाहर नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत रिक्षा चालक योगेश बबनराव रत्नपारखी (३५, रा. कैलास नगर) व अकबर खान वजीर खान पठाण (४०, रा. सादतनगर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.