Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad Crime : बनावट नोटा प्रकरणातील आरोपीने पकडून दिला अट्टल घरफोड्या

Spread the love

औरंगाबाद – दोन दिवसांपूर्वी बनावट नोटा तयार करण्याच्या गुन्ह्यातील आरोपीने अट्टल घरफोड्या पुंडलिकनगर पोलिसांच्या हवाली केला. आकाश अशोक जाधव रा. शाहूनगरबीड हल्ली मुक्काम रांजणगाव शेणपुंजी. असे अटक आरोपीचे नाव आहे. असे बनावट नोटा प्रकरणातील आरो सलीम शेख हा वापरत असलेला मोबाईल चोरीचा असल्याचेपोलिस तपासात उघंड झाल्यावर त्याने तो आकाश जाधव कडून विकंत घेतल्याचे सांगितले. त्यानुसार आकाश ला शिवाजीनगर पाण्याच्या टाकीजवळ बोलावून अधिक चौकशी केली असता. तो अल्पवयीन असल्यापासुन बीड शहर व परिसरात घरफोड्या करत असल्याचे आकाश ने पोलिसांना सांगितले.अल्पवयीन असतांनाच त्याने ११घरफोड्या केल्या आहेत. त्याचे वडील हे मयत असून आईने दुसरे लग्न केल्यामुळै या धंद्यात जम बसवल्याचे आकाश ने पोलिसांना सांगितले.शिवाजीनगर बीड येथे आकाशवर ७गुन्हे दाखल असून शहरातील एम.वाळूज आणि सातारा पोलिस ठाण्यात त्याच्यावर घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत.
वरील कारवाईत एपीआय घन्नशाम सोनवणे यांच्या सहित पीएसआय विकास खटके, पोलिस कर्मचारी रमेश सांगळे, मच्छिंद्र शेळके, बाळाराम चौरे, शिवाजी गायकवाड, स्वप्नील विटेकर यांनी सहभाग घेतला होता.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!