Aurangabad : दिवाळीत फटाक्यांचा आवाज कमीच, ३५ टक्के फटाके शिल्लक, पावसाळी वातावरणाचा फटाका व्यावसायिकांना फटका

औरंंंगाबाद : दिवाळी सणाच्या काळात झालेल्या पावसाचा परिणाम फटाका व्यावसायिकांना सहन करावा लागला. दिवाळी सणाच्या काळात फटाक्यांच्या मालाला फारसा उठाव राहिला नसल्याने जवळपास ३५ टक्के फटाके व्यापा-यांकडे शिल्लक राहिले आहेत. शिल्लक राहिलेले फटाके पुढील वर्षभर आता व्यावसायीकांना सांभाळावे लागणार असल्याची माहिती उत्सव महोत्सव फटाका असोसिएशनचे अध्यक्ष विनोद खामगांवकर यांनी दिली आहे.
यंदा मराठवाड्यात परतीच्या पावसाचे चांगलेच आगमन झाले आहे. मागील आठवडाभरापासून पावसाचा जोर वाढलेला आहे. ऐन दिवाळीतही अनेक ठिकाणी पाऊस होत आहे. त्यामुळे वातावरणात एक दमटपणा असून त्याचा परिणाम फटाके खरेदीवर झाला आहे. दिवाळी सणासाठी यंदाच्या वर्षी तीन ट्रक भरून जवळपास ६० ते ७० लाख रूपयांचे फटाके बाजारात आले होते. परंतु फटाक्यांना उठाव नसल्याने व्यापा-यांकडे ३५ ते ४० टक्के फटाक्यांचा माल पडून आहे.
दरम्यान, दिवाळी सणाच्या काळात अनेक कर्मचा-यांचे वेतन झाले नाही. शेतकNयांच्या हाती पैसा नाही. थोडेबहुत आलेले पीकही परतीच्या पावसामुळे पाण्यात गेले आहे. सोयाबीनचे पीक ऐन काढणीला आल्यानंतर भिजले. त्या पैशातून शेतक-यांना दिवाळी साजरी करता आली असती. या सर्वांचा परिणाम फटाका विक्रीवरही झाला आहे, असल्याचे खामगांवकर यांनी सांगितले.