Aurangabad Police : रिक्षाचालकाने विद्यार्थ्याची गहाळ रक्कम केली परत, उस्मानपुरा पोलिसांची कामगिरी

दुचाकीवरुन जाताना विद्याथ्याचे महाविद्यालयीन शुल्काचे पैसे आणि शैक्षणिक कागदपत्रे गहाळ झाली होती. सचिन धोंडीभाऊ पठारे (२६) हा २ आॅक्टोबर रोजी रमानगर परिसरातून पेट्रोल भरुन निघाल्यानंतर त्याच्या पँटच्या खिशातून १३ हजार रुपये, एटिएम कार्ड, महाविद्यालयाचे ओळखपत्र गहाळ झाले.
यानंतर त्याने उस्मानपुरा पोलिसांकडे तक्रार दिली. त्यावरुन उस्मानपुरा पोलिसांनी देखील सीसी टिव्ही फुटेजच्या माध्यमातून शोध घेतला. त्यादरम्यान ते रिक्षाचालक ईश्वर रामलाल गायकवाड यांना सापडल्याचे समोर आले.पोलिसांनी गायकवाड यांच्याशी संपर्क साधल्यावर त्यांनी ठाण्यात जाऊन ऐवज जमा केला. निरीक्षक दिलीप तारे यांनी तो सचिनला सुपूर्द केला.