Aurangabad Crime : दोन तासात मोबाईल चोर अटकेत, पुंडलिकनगर पोलिसांची कारवाई

औरंगाबाद : पुंडलिकनगर परिसरातील प्रविण कृष्णाराव गायकवाड यांच्या घराखाली असलेल्या कार्यालयातून ३ सप्टेंबर रोजी मोबाईल चोरीला गेला होता. पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात याची तक्रार प्राप्त होताच सहायक निरीक्षक घनश्याम सोनवणे, मच्छिंद्र शेळके यांनी सीसी टिव्ही कॅमेरा फुटेज तपासून त्यात असलेल्या संशयित गौतम सुखदेव हिवाळे (२७, रा. पुुंडलिकनगर) याची ओळख पटली. त्यावरुन त्याला पुंडलिकनगर पोलिसांनी अटक केली. त्याचयाकडून दोन मोबाईल पोलिसांनी जप्त केले.