Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad Crime : जयसिंगपु-यातील तरुणाचा गळा आवळून खून, पंधरा दिवसापूर्वीच झाले होते लग्न 

Advertisements
Advertisements
Spread the love

जयसिंगपु-यातील तरुणाचा गळा आवळून खून,

Advertisements

पंधरा दिवसापूर्वीच झाले होते लग्न

Advertisements
Advertisements

औरंंंगाबाद : पंधरा दिवसापूर्वी लग्न झालेल्या शेख शफिक शेख रफिक (वय २८ ,रा॰ जयसिंगपुरा )याचा गळा आवळून ठार केल्याचे प्रथमदर्शी पोलिसांना दिसून आले आहे॰  गोगाबाबा टेकडीकडे बुधवारी (दि.१८) सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास  शेख शफिकचा मृतदेह एका लाईनमनच्या निदर्शनास आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख शफिक हा घाटी प्रवेशद्वारजवळील बाबू टी हाउस येथे वेटर होता. त्याची पहिली पत्नी वर्षभरापूवी बाळंतपणात मयत झाली होती. त्यास पहिल्या पत्नीचा एक मुलगा आहे . ३० ऑगस्ट रोजी त्याचे दुसरे लग्न झाले. गेल्या तीन दिवसांपासून तो कामावर गेलेला नव्हता. बेगमपु-यातील एका चहाच्या हॉटेलवर तो येऊन बसत होता॰ तीन-चार चहा पिऊन तो पुन्हा घराकडे निघून जात होता॰ त्याने कामाच्या मजूरीतून मिळविलेले पैसे एका गल्ल्यात ठेवले होते. हे पैसे घेउन तो मंगळवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास जेवन करून तो बार तंबाखू खाण्यासाठी टाउन हॉल येथील एका पान टपरीवर गेला. टपरीवर तंबाखू आणि चूना घेतल्यानंतर शफिक बेगमपु-याकडे पायी निघाला मात्र तो घरी परतलाच नाही.

दरम्यान बुधवारी सकाळी १०॰३०वाजेच्या सुमारास महावितरणचे लाईनमन हे कामानिमित्त गोगाबाबा टेकडीच्या पायथ्याशी गेले होते तेथे लाईनमनला शफिक मृतावस्थेत पडलेला दिसला त्यांनी या घटनेची माहिती बेगमपुरा पोलिसांना कळविली बेगमपु-याचे पोलीस निरीक्षक सचिन सानप, उपनिरीक्षक सय्यद सिद्दिकी, गुन्हेशाखेचे निरीक्षक मधुकर सावंत  यांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर पोलिसांनी पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात दाखल केला॰ गुन्हेशाखा आणि बेगमपुरा ठाण्याचे पथक आरोपीचा शोध घेत आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!