पूजा बेदीची लग्नाची तयारी

अभिनेत्री आणि स्तंभलेखिका पूजा बेदी हिला तिच्या घटस्फोटानंतर तब्बल १५ वर्षांनी मानेक कॉन्ट्रॅक्टरच्या रुपात आपला ‘प्रिन्स चार्मिंग’ सापडला असून लवकरच दोघंही लग्नबंधनात अडकणार असल्याचे वृत्त आहे. पूजा आणि मानेक यांचा साखरपुडा व्हॅलेंटाइन डेच्या मुहूर्तावर झाला. याच दिवशी २००३ मध्ये पूजाचा घटस्फोट झाला होता. आपला पहिला पती इब्राहिम फर्निचरवाला याच्याशी पूजाचं १९९० मध्ये लग्न झालं होतं. ४८ वर्षीय पूजा बेदी याच वर्षी लग्नाची गाठ बांधणार आहे. पूजाची लेक आलिया फर्निचरवाला बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. तिच्या शूटिंगच्या तारखा कळल्या आणि मुलाला कॉलेजच्या सुट्ट्या लागल्या की लगेच तारीख ठरवून पूजा आणि मानेक लग्न करणार आहेत, अशी माहिती पूजाने बॉम्बे टाइम्सला दिली.