Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad : पत्नीच्या खून प्रकरणात फरार असलेल्या पतीला सातारा पोलिसांकडून अटक

Advertisements
Advertisements
Spread the love

 सातारा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या खून प्रकरणात मयत विवाहितेचा पती कय्युमखान बशीरखान याला अटक करण्यात आली असल्याची माहिती  पोलिस निरीक्षक अनिल आडे यांनी दिली आहे.


या प्रकरणाची अधिक माहिती अशी कि ,  दोन वर्षापूर्वी विवाह झालेल्या २० वर्षीय विवाहितेचा संशयास्पद मृत्यू झाला होता . दिनांक  १८ जुलै रोजी सकाळी सव्वानऊ वाजेच्या सुमारास सातारा परिसरातील उर्जानगर भागात ही घटना घडली होती . दरम्यान, विवाहितेचा खून करून ती आत्महत्या भासविण्याचा प्रयत्न पतीसह सासरकडील मंडळी करीत असल्याचा आरोप करीत माहेरच्या नातेवाईकांनी सातारा पोलिस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले होते . या प्रकरणी प्रारंभी अकस्मात  मृत्यूची नोंद सातारा पोलिसांनी घेतल्यानंतर रात्री उशीरा पर्यंत मयताच्या नातेवाईकांनी  सासरच्या मंडळींवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची भूमिका  घेतली होती त्यानंतर आता या प्रकरणात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Advertisements

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समरीन फातेमा कय्यूम खान (वय २०, रा.प्लॉट नंबर ७, उर्जानगर, बीडबायपास) हिचा विवाह दोन वर्षापुर्वी इंजिनियर असलेल्या कय्यूम खान बशीर खान याच्यासोबत झाला होता. लग्नाचे काही दिवस व्यवस्थीत नांदविल्यानंतर पतीसह सासरकडील मंडळी समरीन फातेमा हिचा घरगुती कारणावरून शारीरिक व मानसिक छळ करीत होते. गुरूवारी सकाळी सव्वानऊ वाजता समरीन फातेमा हिने आपल्या खोलीतील छताच्या पंख्याला ओढणीने बांधून  गळफास घेतला. हा प्रकार तिच्या पतीच्या लक्षात आल्यावर त्याने समरीन फातेमा हिला फासावरून खाली उतरवून बेशुध्दावस्थेत उपचारासाठी सकाळी पावणेबारा वाजेच्या सुमारास घाटीत दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मयत घोषीत केले.

Advertisements
Advertisements

या प्रकरणी सातारा पोलिसानी प्रथम दर्शनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती . दरम्यान, समरीन फातेमा हिने सकाळी सव्वानऊ वाजेच्या सुमारास गळफास घेतला असल्याचे आढळून  आल्यावर सासरकडील मंडळीने दुपारी पावणेबारा वाजता घाटीत का दाखल केले, दोन ते अडीच तास समरीन फातेमा कोठे होती याचा तपास करून सासरच्या पतीसह सासरच्या मंडळीवर खूनाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी करीत माहेरच्या नातेवाईकांनी सातारा पोलिस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले होते . पोलिस निरीक्षक अनिल आडे यांनी संतप्त नातेवाईकांची समजूत कडून  आरोपींना अटक करण्याचे आश्वासन दिल्यावर नातेवाईकांनी आपले आंदोलन मागे घेतले आणि आज या प्रकरणात नवरा कय्युमखान बशीरखान, दीर फिरोजखान बशीरखान, नणंद तब्बसुमबशीरखान यांच्या विरुध्द खुनाचा गुन्हा दाखल केला. तेंव्हापासून आरोपी कय्युमखान बशीरखं फरार होता काळ सातारा पोलिसांनी त्याला अटक केल्याचे सांगण्यात आले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!