Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

सार्वजनीक गुढी महोत्सवाच्या अध्यक्षपदी नगरसेवक विकास कांबळे तर स्वागताध्यक्षपदी अमोल गिते यांची निवड

Spread the love

लातूर, (अरुण जे कांबळे) : लातूरच्या गंजगोलाईतील ‘प्रथम मानाच्या सार्वजनीक गुढी महोत्सव’ समिती २०२६ च्या अध्यक्षपदी लातूरचे नगरसेवक तथा मनपा स्थाई समिती सदस्य विकास सतिशराव कांबळे यांची निवड करण्यात आली आहे. तसेच स्वागताध्यक्षपदी अमोल गिते यांची निवड करण्यात आली आहे. सार्वजनिक गुढी महोत्सवाचे संस्थापक अध्यक्ष पंकज जैस्वाल यांनी बालाजी गवळी यांच्या अध्यक्षतेत झालेल्या बैठकीत ही निवड जाहीर केली आहे.

उर्वरीत कार्यकारीणी पुढील प्रमाणे : उपाध्यक्ष -संजय सोनकांबळे, कोषाध्यक्ष – रामेश्वर भराडीया, सचिव – नितिन पडिले, कार्यक्रम प्रमूख – रामभाऊ जवळगे, सहकोषाध्यक्ष – नारायण भूतडा, सदस्य – काकासाहेब घुटे, धनंजय पाटील, बालाजी नागरगोजे, रवि जाधव, सचिन गांगले आदी. या नूतन कार्यकारीणीचा सत्कार गुढी महोत्सवाचे संस्थापक अध्यक्ष पंकज जैस्वाल यांच्या हस्ते करणात आला. सार्वजनिक गुढी महोत्सवाचे हे ३८ वे वर्ष आहे. यंदा गुढी पाडवा सण गुरुवार १९ मार्च रोजी साजरा करण्यात येणार असून त्यानिमित विविध सामितीचे गठण आणि सार्वजनीक उपक्रमांची माहिती देण्यात येईल असे संस्थापक अध्यक्ष पंकज जैस्वाल यांनी यावेळी सांगीतले. नूतन कार्यकारीणीचे स्वागत विविध स्तरातून होत आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!