Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

वेदना कमी करणारी गोळी निमेसुलाइड धोकादायक ठरली? केंद्र सरकारचा मोठा निर्णय

Advertisements
Advertisements
Spread the love

100 मिग्रॅहून अधिक डोसवर तात्काळ बंदी. आरोग्याला धोका असल्याचा निष्कर्ष, सुरक्षित पर्याय उपलब्ध असल्याचं सरकारचं स्पष्ट मत. ड्रग अँड कॉस्मेटिक कायद्यानुसार उत्पादन, विक्री आणि वितरणावर कारवाई.

केंद्र सरकारने प्रसिद्ध वेदनाशामक औषध निमेसुलाइड संदर्भात मोठा आणि धक्कादायक निर्णय घेतला आहे. 100 मिग्रॅहून अधिक डोस असलेल्या तात्काळ परिणाम करणाऱ्या (Immediate Release) सर्व तोंडी निमेसुलाइड औषधांच्या उत्पादन, विक्री आणि वितरणावर तात्काळ बंदी घालण्यात आली आहे. मानवी आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो, असा निष्कर्ष नोंदवत हा निर्णय घेण्यात आला आहे.

Advertisements

आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने ड्रग टेक्निकल अ‍ॅडव्हायझरी बोर्डाशी सल्लामसलत करून ड्रग अँड कॉस्मेटिक कायदा 1940 च्या कलम 26A अंतर्गत ही बंदी लागू केली आहे. मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे की, वेदना कमी करण्यासाठी बाजारात निमेसुलाइडपेक्षा अधिक सुरक्षित पर्याय उपलब्ध आहेत.

Advertisements
Advertisements

विशेष म्हणजे, 12 वर्षांखालील मुलांसाठी निमेसुलाइडवर 2011 पासून आधीच बंदी आहे. अनेक आंतरराष्ट्रीय अभ्यासांमध्येही या औषधाचे दुष्परिणाम समोर आले आहेत. त्यामुळेच फिनलंड, स्पेन, आयर्लंड, बेल्जियम, अमेरिका, कॅनडा, जपान, ऑस्ट्रेलिया आणि यूके यांसारख्या देशांनी यापूर्वीच निमेसुलाइडवर बंदी घातली आहे.

युतीचा डाव फसला! वंचितकडून 16 जागांवर उमेदवारच नाहीत, काँग्रेसची मोठी अडचण

दरम्यान, केंद्र सरकारने ड्रग्स नियम 1945 मध्ये सुधारणा सुचवणारा मसुदाही जाहीर केला असून, यावर नागरिकांकडून 30 दिवसांत सूचना व हरकती मागवण्यात आल्या आहेत. आरोग्याच्या दृष्टीने हा निर्णय किती निर्णायक ठरणार, याकडे आता सर्वांच लक्ष लागलं आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!