Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

ओबीसी विदयार्थ्यांच्या मागण्यांसाठी गिरगाव चौपाटीवर लक्ष्मण हाके यांचे पाण्यात उतरून आंदोलन….

Spread the love

मुंबई  : ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी  ओबीसी विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी थेट समुद्रात उतरून आंदोलन केलं. त्यांनी गिरगाव चौपाटीवर काही विद्यार्थी आणि कार्यकर्त्यांसह समुद्रात उतरून आंदोलन केलं. यावेळी लक्ष्मण हाकेंसह कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. उठ ओबीसी जागा हो, संघर्षाचा धागा हो, अशा घोषणा देत त्यांनी सरकारचा निषेध केला. सरकारमधील ओबीसी नेत्यांचा आणि मंत्र्यांचा देखील निषेध करण्यात आला.

यावेळी उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांनी महाज्योती योजनेवर सरकारकडून दुजाभाव केला जात असल्याचा आरोप केला. सरकारकडून सारथी आणि बार्टी सारख्या योजनांना भरभरून अनुदान दिलं जातं. पण ओबीसी विद्यार्थ्यांसाठी असलेल्या महाज्योती योजनेला सरकारकडून पैसे दिले जात नाही, असा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. सारथी आणि बार्टीच्या विद्यार्थ्यांना नोंदणीच्या दिवसापासून फेलोशिप दिली जातेय, पण महाज्योतीला निधी दिली जात. तीन वर्षांपासून विद्यार्थी निधीसाठी झटत आहेत, पण सरकारकडून दखल घेतली जात नाहीये, त्यामुळे आम्ही आज समुद्रात उतरून आंदोलन करत असल्याची भूमिका विद्यार्थ्यांनी मांडली.

लक्ष्मण हाकेंच्या या आंदोलनानंतर पोलीस प्रशासन तातडीने गिरगाव चौपाटीवर दाखल झालं. पोलिसांनी पाण्यात शिरून लक्ष्मण हाकेंसह त्यांच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे. पोलिसांकडून ही कारवाई केली जात असताना, ओबीसी कार्यकर्त्यांनी घटनास्थळी जोरदार घोषणाबाजी केली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!