Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MarathwadaNewsUpdate : तुळजा भवानीच्या ८ पुजाऱ्यांना मंदिर प्रवेशाला बंदी , मंदिर प्रशासनाचा निर्णय

Advertisements
Advertisements
Spread the love

धाराशिव:  तुळजापुर येथील श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानाने मंदिरातील आठ पुजारांवर मंदिरात प्रवेश करण्याबाबत थेट प्रवेशबंदी करण्यात आली आहे. त्यामुळे आठपैकी सहा पुजाऱ्यांना एक महिन्यांसाठी प्रवेश बंदी आहे. तर दोन पुजाऱ्यांना तीन महिन्यांची प्रवेश बंदी केली आहे.

तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मंदिर परिसरात तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थ खाऊन थुंकल्याबाबत मंदिर संस्थानाकडून अलीकडेच काही पुजाऱ्यांना कारवाईचा इशारा देऊन नोटीस देण्यात आल्या होत्या. या 8 पुजाऱ्यांवर मंदिर संस्थान कडून प्रवेशबंदीची कारवाई करण्यात आली आहे.

Advertisements

नोटीस बजावण्यात आलेल्या पुजाऱ्यांपैकी 6 जणांनी नोटिशीची दखल घेऊन आपला माफीनामा सादर केला. त्यांच्यावर 1 महिन्याची प्रवेशबंदी करण्यात आली. तर नोटीस देऊनही खुलासा किंवा माफीनामा न देणाऱ्या दोन पुजाऱ्यावर तीन महिन्याची बंदी करण्यात आली आहे. संबंधित पुजाऱ्यांना अशोभनीय व मंदिराचे शिस्तीस बाधा आणणारे तसेच कायदा व सुव्यवस्थेस अडथळा निर्माण करणारे वर्तन करण्यास जबाबदार ठरवण्यात आले आहे. ही कारवाई देऊळ कवायत कायदा 1909 कलम 24 व 25 नुसार करण्यात आली आहे. दरम्यान या कार्यवाहीमुळे अस्वच्छता करणाऱ्या पुजाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.

Advertisements
Advertisements

खुलासा सादर केला (1 महिना बंदी) 

1. लखन रोहिदास भोसले
2. अक्षय किशोर कदम-भैय्ये
3. विशाल हनुमंत चव्हाण
4. धीरज राजू चोपदार
5. वैभव खुशालराव भोसले
6. राहुल हनुमंत पवार

कोणताही खुलासा सादर केला नाही (3 महिने बंदी) 

1. विशाल दादासाहेब मगर
2. विशाल बाळासाहेब गंगणे

आपलं सरकार

Click to listen highlighted text!