Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Economic Survey 2025 : आर्थिक पाहणी अहवालानुसार सोन्याच्या दरामध्ये होऊ शकते घसरण

Spread the love

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत सादर केलेल्या 2024-25 च्या आर्थिक पाहणी अहवालानुसार सोन्याच्या दरामध्ये घसरण होऊ शकते, असा अंदाज वर्तवला आहे. तर, चांदीचे दर वाढू शकतात असे सांगण्यात आले आहे. या आर्थिक पाहणी अहवालात 2025 मध्ये कमोडिटीच्या किमती 5.1 टक्क्यांनी तर 2026 मध्ये 1.7 टक्क्यांनी कमी होतील, असा अंदाज आहे.

दरम्यान लोखंड आणि तांब्याच्या दरात घसरण होईल, त्याचा देखील परिणाम होईल, अशी अपेक्षा आहे.भारताकडून आयात केल्या जाणाऱ्या वस्तूंच्या किमतीत घसरण होण्याचा अंदाज व्यक्त होत असल्यानं देशांतर्गत महागाई दराच्या दृष्टीने ही चांगली बाब आहे. ऑक्टोबर 2024 च्या जागतिक बँकेच्या कमोडिटी बाजार अहवालाचा दाखला देत आर्थिक पाहणी अहवालात खनिज तेलाच्या दरातही घसरणीचा अंदाज आहे. मात्र, त्याचवेळी प्राकृतिक गॅसच्या दरात वाढीचा अंदाज आहे.

भारतात सोन्याची आयात का वाढली?

जागतिक अस्थिरता, विदेशी चलनाच्या गंगाजळीतील चढ उतार वाढलेले आहेत. त्यामुळं 2024 मध्ये सोन्यामध्ये गुंतवणूक वाढलेली आहे. सोनं दुसऱ्या महायुद्धानंतरच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचलं आहे. केंद्रीय बँकंद्वारे सोने साठवण्याची भूमिका घेतली गेल्याचा देखील परिणाम आहे. जागतिक पातळीवर किंमतीमधील वाढ, सणांच्या काळातील सुरुवातीची खरेदी, सुरक्षित गुंतवणूक आणि संपत्तीच्या मागणीमुळं सोन्याच्या खरेदीत आणि आयातीत वाढ झाली आहे. भारत जगातील सोने आयात करणारा मोठा देश आहे.

विदेशी गंगाजळीतील चढ उतार
आंतरराष्ट्रीय पातळीवरील अस्थिरतेमुळं विदेशी गंगाजळीच्या रचनेत चढ उतार पाहायला मिळतोय. केंद्रीय बँकांनी जोखीम कमी करण्यासाठी आपल्याकडील गंगाजळीचे  समायोजन करात आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने जागितक रिझर्व्ह यंत्रणेत बदल होत असल्याचे म्हटले आहे . त्यामुळे डॉलरचं वर्चस्व कमी होत असून नव्या चलनांच्या वापराची भूमिका वाढत आहे, असं म्हटलं.

सोन्याच्या दरातील घसरणीच्या अंदाजामुळं गुंतवणूकादारांच्यावर परिणाम होऊ शकतो.तर, चांदीच्या दरामध्ये वाढ होईल याला सराफ बाजारातून देखील समर्थन मिळू शकते . 2025-26 या आर्थिक वर्षात सोने चांदी खरेदी विक्री, या क्षेत्रातील विविध बाबींकडे सरकारचे लक्ष राहील असा अंदाज आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!