Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Union Budget 2025 : 2025-26 च्या अर्थसंकल्पात काय स्वस्त? काय महाग ?

Spread the love

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज (1 फेब्रुवारी 2025) देशाचा अर्थसंकल्प मांडला. निर्मला सीतारामन यांनी सलग आठव्यांदा अर्थसंकल्प (Union Budget 2025) सादर केला. केंद्र सरकारच्या 2025 च्या अर्थसंकल्प मांडताना गरीब, तरुण, महिला आणि शेतकरी यांच्या विकासावर लक्ष केंद्रित केले जाईल, असं नमूद केलं. तसेच शेतकऱ्यांसाठी देखील मोठ्या घोषणा करण्यात आल्या. निर्मला सीतारामन यांनी शेतकऱ्यांसाठी धनधान्य योजना आणणार असल्याचं जाहीर केलं. किसान क्रेडिटकार्डची मर्यादा 3 लाखांवरुन 5 लाखांवर केली जाणार अशी घोषणा निर्मला सीतारामन यांनी यावेळी केली.

कापूस उत्पादनाला विज्ञान आणि तंत्रज्ञानाची जोड

भाज्या आणि फळांचे उत्पादन वाढविण्यासाठी तसेच त्यांचा कार्यक्षम पुरवठा करण्यासाठी राज्यांच्या भागीदारीत व्यापक कार्यक्रम सुरू केला जाईल. कापूस उत्पादकतेसाठी 5 वर्षांचे अभियान जाहीर करण्यात येईल. कापसाचे उत्पादन वाढवण्यासाठी पाच वर्षांचे विशेष अभियान राबवले जाणार असून कापसाच्या विविध जाती विकसित करणार. यासह कापूस उत्पादनाला विज्ञान आणि तंत्रज्ञानाची जोड देणार. दर्जेदार कापूस निर्यातीवर सरकार भर देणार असल्याचे ही अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या. दरम्यान, किसान क्रेडिट कार्डसंदर्भात मोठा निर्णय यावेळी घेण्यात आला असून कर्जाची मर्यादा आता 3 लाख रुपयांवरुन 5 लाखांपर्यंत वाढवली जाणार असल्याचे ही त्या म्हणाल्या.

बजेटमधील मोठे मुद्दे

• धनधान्य योजना शेतकऱ्यांसाठी लागू
• किसान क्रेडिट कार्डची मर्यादा ₹3 लाखांवरून ₹5 लाखांपर्यंत वाढवली
• डाळींसाठी आत्मनिर्भरता मिशन – 6 वर्षांसाठी विशेष योजना
• युरिया उत्पादनात स्वयंपूर्णता – पुरवठा वाढवण्यासाठी नवे पाऊल
• आसाममध्ये १२.७ लाख मेट्रिक टन क्षमतेचा प्लांट उभारणार
• बिहारमध्ये मखाना बोर्ड स्थापन
• एमएसएमई वर्गीकरण नियमांत बदल
• गुंतवणूक मर्यादा 2.5 पट वाढणार
• उलाढाल मर्यादा दुप्पट होणार
• तूर, उडीद, मसूर यांसाठी 6 वर्षांसाठी विशेष अभियान
• केंद्रीय एजन्सी पुढील 4 वर्षांत तूर, उडीद आणि मसूर खरेदी करणार
स्टार्टअप आणि उद्योगांसाठी तरतूद
• स्टार्टअप्ससाठी ₹१०,००० कोटींची तरतूद
• एससी/एसटी महिलांना स्टार्टअप्ससाठी कर्ज स्वरूपात मदत
• महिलांना स्टार्टअपसाठी ₹२ कोटींची मदत
• भारताला खेळण्यांचे आंतरराष्ट्रीय केंद्र बनवण्यासाठी विशेष योजना
• नाॅन-लेदर फुटवेअर उत्पादकांसाठी प्रोत्साहन योजना
शिक्षण आणि कौशल्य विकास
• कौशल्य प्रशिक्षणासाठी ५ राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्रे
• आयआयटी क्षमतावाढ प्रकल्प राबवणार
• मेडिकल कॉलेजसाठी मोठी तरतूद
• पुढील वर्षात १०,००० अतिरिक्त जागा उपलब्ध
• पुढील ५ वर्षांत ७५,००० जागांची भर
• शिक्षणासाठी एआय उत्कृष्टता केंद्र उभारणार
• ₹५०० कोटींची विशेष तरतूद

• २०० डे-केअर कॅन्सर केंद्रे उघडणार
• नव्या योजनांसाठी ₹१० लाख कोटी गुंतवणूक
• जल जीवन मिशन २०२८ पर्यंत वाढवण्यात आले
• न्युक्लिअर एनर्जी मिशन
• खासगी क्षेत्रासोबत भागीदारी
• १०० गिगावॉट न्युक्लिअर एनर्जी निर्मितीचे लक्ष्य (२०४७ पर्यंत)
• अणू क्षेत्रात संशोधन आणि विकाससाठी 20 हजार कोटींची तरतूद
• स्वदेशी बनावटींनी तयार केलेल्या अणू भट्ट्यांसाठी वीस हजार कोटी
• २०३३ पर्यंत अणुभट्ट्या कार्यरत होणार

अर्थसंकल्पात काय स्वस्त?

– LED-LCD च्या किंमती कमी होणार

– टीव्हीचे पार्ट्स स्वस्त होणार

– मोबाईल स्वस्त होणार

– मोबाईलच्या बॅटरीसंदर्भातील 20 भांडवली वस्तूंना सूट

– कॅन्सरग्रस्त रुग्णांसाठी 56 औषधं कस्टम ड्युटी फ्री

– लिथियम बॅटरीत लागणारी कोबाल्ट पावडर

– भारतात तयार होणार कपडे स्वस्त होणार

– चामड्यांपासून बनवलेल्या वस्तू स्वस्त होणार

– गोठवलेल्या माशांच्या पेस्टवरील मूलभूत सीमाशुल्क 30% वरून 5% पर्यंत कमी करणार

महाग काय?

– इंटरॅक्टिव्ह फ्लॅट पॅनेल डिस्प्लेवरील सीमाशुल्कात वाढ

– फॅबरिक (Knitted Fabrics)

– बऱ्याच आवश्यक वस्तूंवर सीमाशुल्क कमी किंवा सूट दिली जाणार आहे. परंतु काही वस्तू महाग होणार आहेत, विशेषतः तंत्रज्ञान आणि उत्पादन क्षेत्रात.

कोणत्या उत्पन्न गटाला किती टॅक्स?

0 ते 4 – Nil
4 ते 8- 5 टक्के
8 ते 12 लाख – 10 टक्के
12 ते 16 लाख – 15 टक्के
16 ते 20 लाख – 20 टक्के
20 ते 24 लाख – 25 टक्के
24 लाखापुढे – 30 टक्के

अर्थसंकल्पामधील मोठे निर्णय

– डाळींचे उत्पादन वाढवण्यासाठी विशेष योजना – पुढील 6 वर्षे तूर, मसूर आणि इतर डाळींच्या उत्पादनावर भर
– कापसाच्या उत्पादनासाठी 5 वर्षांचे मिशन – यामुळे देशातील वस्त्र उद्योगाला चालना मिळणार
– किसान क्रेडिट कार्डवरील कर्ज मर्यादा ₹3 लाखांवरून ₹5 लाखांपर्यंत वाढवली
– बिहारमध्ये मखाना बोर्ड स्थापन – छोट्या शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना फायदा
– लघुउद्योगांसाठी विशेष क्रेडिट कार्ड योजना – पहिल्या वर्षी 10 लाख क्रेडिट कार्ड जारी केली जाणार

आपलं सरकार

Click to listen highlighted text!