Republic Day Special News Update : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा, महाराष्ट्रातून तिघांचा सन्मान

नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी समाजाच्या जनहितासाठी काम करणाऱ्या नायक आणि वीरांना देशाच्या मानाच्या पुरस्काराने गौरविण्यात आलं आहे. देशातील सर्वोच्च नागरी सन्मानांपैकी एक पद्म पुरस्कार हे पद्म विभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री या तीन श्रेणींमध्ये दिले जातात. केंद्र सरकारने पद्मश्री पुरस्कारासाठी ३० नावांची घोषणा केली आहे. भीमसिंग भावेश, डॉ.नीरजा भाटला, ॲथलीट हरविंदर सिंग यांना पद्म पुरस्कार मिळाले आहेत. तर होमिओपॅथी चिकिस्तक असलेल्या डॉ. विलास डांगरे आणि वनअभ्यासक मारुती चितमपल्ली यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.
1954 पासून दर प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कार जाहीर करण्यात येतात. या पुरस्कारासाठी ज्यांच्या नावाची घोषणा झाली, त्यांचा राष्ट्रपती भवनामध्ये एक भव्य कार्यक्रमाचं आयोजन करून या पुरस्कारानं गौरवण्यात येतं. केंद्र सरकारने प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला शनिवारी (25 जानेवारी 2025) पद्म पुरस्कार 2025 च्या विजेत्यांची घोषणा केली. 7 व्यक्तींना पद्मविभूषण, 113 व्यक्तींना पद्मश्री आणि 19 व्यक्तींना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. देशातील सर्वोच्च नागरी सन्मानांपैकी एक असलेल्या पद्म पुरस्कारांनी एकूण १३९ व्यक्तींना सन्मानित करण्यात आले आहे, जे पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री या तीन श्रेणींमध्ये दिले जातात.
गोवा स्वातंत्र्य चळवळीच्या सेनानी लिबिया लोबो सरदेसाई, मध्य प्रदेशातील उद्योजिका शैली होळकर, मराठी लेखक मारुती भुजंगराव चितमपल्ली यांना पद्मश्री देण्यात येणार आहे. दिल्लीच्या स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. नीरजा भाटला, सामाजिक कार्यकर्ते भीमसिंह भावेश, पुद्दुचेरी येथील थविल वादक पी. दत्चनमूर्ती, पश्चिम बंगालमधील धक वादक गोकुल चंद्र दास, कुवेतमधील योग शिक्षिका शेखा एजे अल सबा, उत्तराखंडमधील ट्रॅव्हल ब्लॉगर जोडपे ह्यूग आणि कॉलीन गँटझर, नागालँडमधील फळ उत्पादक एल हँगथिंग, भैरूसिंग चौहान, कादंबरीकार जगदीश जोशीला यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
महाराष्ट्रातून तिघांचा सन्मान
महाराष्ट्रातील प्रसिद्ध होमिओपॅथ डॉ. विलास डांगरे यांचा समावेश आहे. डांगरे यांना पद्मश्री पुरस्काराने सम्मानीत करण्यात आले आहे. गेल्या ५० वर्षात त्यांनी एक लाखाहून अधिक रुग्णांना बरे केले आहे. तसेच पर्यावरण आणि वनसंवर्धनात काम करणाऱ्या पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. अरण्यऋषी म्हणून ओळख असलेल्या मारुती चितमपल्ली यांनाही पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.
पद्म विभूषण
1. जॉर्ज फर्नांडिस (मरणोत्तर) सार्वजनिक सेवा बिहार
2. अरुण जेटली (मरणोत्तर) सार्वजनिक सेवा दिल्ली
3. सुषमा स्वराज (मरणोत्तर) सार्वजनिक सेवा दिल्ली
4. सर अनिरुद्ध जगन्नाथ जीसीएसके सार्वजनिक सेवा मॉरिशस
5. एम. सी. मेरी कोम क्रीडा मणिपूर
6. छन्नूलाल मिश्र कला उत्तर प्रदेश
7. विश्वेश तीर्थ स्वामी श्री पेजावर मठ (मरणोत्तर) अध्यात्म कर्नाटक
पद्मश्री
1. मारुती चित्तमपल्ली साहित्य महाराष्ट्र
2. विलास डांगरे आरोग्य (होमिओपॅथी) महाराष्ट्र
3. चैतराम पवार साहित्य महाराष्ट्र
4. पंडीराम मांडवी हस्तकला छत्तीसगड
5. राधा बहीन भट्ट समाजकार्य उत्तराखंड
6. सुरेश सोनी समाजकार्य (आरोग्य) गुजरात
7. जॉयनाचरन बथारी कला (लोककला) आसाम
8. निर्मलादेवी कला (सुजनी) बिहार
9. व्यंकप्पा सुगतेकर कला (गोंधळ) कर्नाटक
10. जुमडे योमगाम गॅमलिन समाजकार्य अरुणाचल प्रदेश
11. हरिमन शर्मा कृषी हिमाचल प्रदेश
12. नरेन गुरुंग कला (गायन) सिक्कीम
13. शेख ए. जे. अल सबाह आरोग्य (योग) कुवेत
14. भैरूसिंग चौहान कला (निर्गुण गायन) मध्य प्रदेश
15. जगदीश जोशिला साहित्य-शिक्षण मध्य प्रदेश
16. एल. हांगथिंग कृषी नागालँड
17. पी. दतचनामूर्ती कला (संगीत) पुद्दुचेरी
18. भीमसिंह भावेश समाजकार्य बिहार
19. हरविंदरसिंग क्रीडा (पॅरालिम्पियन) हरियाना
20. जोनास मसेत्ती अध्यात्म ब्राझील
21. लिबीया लोबो सरदेसाई समाजकार्य (स्वातंत्र्यसैनिक) गोवा
22. गोकुळचंद्र डे कला (संगीत) पश्चिम बंगाल
23. सॅली होळकर व्यापार-उद्योग (वस्त्रोद्योग) मध्य प्रदेश
24. बातूल बेगम कला राजस्थान
25. वेलू आसान कला तमिळनाडू
26. डॉ. नीरजा भाटला आरोग्य दिल्ली
27. हघ गँटेझर पर्यटन उत्तराखंड
28. गॅलिन गँटेझर पर्यटन उत्तराखंड
29. अच्युत पालव
30. अरुंधती भट्टाचार्य
31. अशोक सराफ
32. अश्विनी देशपांडे
परदेशी नागरिकांचाही सन्मान
शेखा एजे अल सबाः कुवेतच्या योगसाधक अल सबा यांना योग चिकित्सामध्ये पद्मश्री पुरस्कार देण्यात आला. त्यांनी त्यांच्या देशातील पहिला परवानाधारक योग स्टुडिओ स्थापन केला. याद्वारे अल सबाहने आखाती देशांमध्ये आधुनिक पद्धतींसह योगास प्रोत्साहन दिले आणि शम्स यूथ योगाची सह-स्थापना केली.
जोनास मॅसेट: ब्राझिलियन मेकॅनिकल अभियंता हिंदू आध्यात्मिक नेता बनलेले जोनास यांनी भारतीय अध्यात्म, तत्त्वज्ञान आणि संस्कृतीचा प्रचार केला. जागतिक स्तरावर वेदांत ज्ञानाचे शिक्षणही त्यांनी सोपे केले. २०१४ मध्ये त्यांनी विश्वविद्येची स्थापना केली. त्याचे कार्यालय रिओ दि जानेरो येथे आहे.