Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

शाह यांच्या माफीवरून एनडीए मध्ये मतभेद , शाह यांनी माफी मागावी असे लिहिल्याने आरएलडी च्या प्रवक्त्याची हकालपट्टी !!

Spread the love

लखनौ : गृहमंत्री अमित शहा यांनी बाबासाहेब आंबेडकरांवर केलेल्या वक्तव्यावर टीका करणे आरएलडीच्या प्रवक्त्याला महागात पडले. राष्ट्रीय लोकदलाने पक्षाच्या सर्व प्रवक्त्यांना त्यांच्या पदावरून हटवले आहे. राष्ट्रीय अध्यक्ष जयंत चौधरी यांच्या आदेशानंतर प्रवक्त्यांना त्यांच्या पदावरून हटवण्यात आल्याची माहिती आरएलडीकडून जारी करण्यात आली आहे. आरएलडी संघटनेचे महासचिव त्रिलोक त्यागी यांनी यासंदर्भात एक पत्र जारी केले आहे.

आरएलडी हा भाजपचा मित्रपक्ष आहे हे विशेष. आरएलडीचे प्रवक्ते कमल गौतम म्हणाले होते की, अमित शाह यांनी डॉ. आंबेडकरांबाबत केलेले वक्तव्य योग्य नाही. लोक बाबासाहेबांना देव मानतात आणि यापुढेही मानतील. जोपर्यंत सरकारचा प्रश्न आहे, तुम्ही लोक कायदा आणि सुव्यवस्थेचे लोक आहात. देवाच्या मंदिरातही अत्याचार होत आहेत. मंदिरात प्रवेश करूनही लोकांना मारहाण केली जात आहे. अशा प्रकरणांमध्ये कोणतीही कारवाई होत नाही. अशा विधानाची गरज नाही. गृहमंत्र्यांनी माफी मागावी, अमित शाह यांचे बाबासाहेबांविषयीचे विधान योग्य नव्हते. तुम्ही गृहमंत्री आहात. सध्या कायदा-सुव्यवस्था ठीक नाही. त्यामुळे त्यांनी माफी मागावी, अशी आमची मागणी आहे. कारण त्यांचे विधान गंभीर आहे. हे केवळ भारतातच नाही तर जगभरातील त्यांच्या अनुयायांपर्यंत हे पोहचणार असल्याचे गौतम म्हणाले होते.

आरएलडीचे प्रवक्ते कमल गौतम यांच्या शाह यांनी माफी मागावी या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर युजर्सनी भाजप आणि जयंत चौधरी यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली. प्रचंड पेच निर्माण झाल्यानंतर आरएलडीने आपल्या सर्व प्रवक्त्यांना पदावरून हटवण्याचा निर्णय घेतल्याचे मानले जात आहे. प्रवक्त्यांच्या नव्या पॅनलची लवकरच घोषणा करण्यात येणार असल्याचे पक्षाने म्हटले आहे.

विशेष केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील विधानाचे पडसाद आता ‘एनडीए’मध्येही उमटू लागले आहेत. मागील आठवड्यात एनडीएकहा मित्र पक्ष असलेल्या आरएलडीच्या प्रवक्त्यानेच शहांवर टीका केली होती. त्यानंतर संबंधित पक्षाचे प्रमुख असलेल्या केंद्रीय मंत्र्यांनी पक्षाच्या सर्व प्रवक्त्यांना हटवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.राष्ट्रीय लोकदलाचे प्रमुख व केंद्रीय मंत्री जयंत चौधरी यांनी सर्व प्रवक्त्यांना हटवले आहे.

कमल गौतम यांनी शहांवर निशाणा साधल्यानंतर जयंत चौधरी यांच्या पक्षाने मोठा निर्णय घेतला. पक्षाचे महासचिव त्रिलोक त्यागी यांनी सर्व राष्ट्रीय व राज्य प्रवक्त्यांना तातडीने हटवण्यात आल्याची माहिती दिली. काही प्रवक्ते सक्रीय नसल्याने आणि काही प्रवक्ते अति उत्साही असल्याने हटवण्यात आले आहेत. काही दिवसांनंतर नव्या प्रवक्त्यांची नियुक्ती केली जाईल, असे त्यागींनी सांगितले.

राष्ट्रीय लोकदलाचे उत्तर प्रदेशचे प्रमुख रामशिष राय यांनी मात्र कमल गौतम यांच्या विधानामुळे प्रवक्त्यांना हटवण्यात आल्याचे मान्य केले मात्र गौतम यांच्या विधानावर जयंत चौधरी नाराज आहेत का, या प्रश्नावर राय यांनी उत्तर देण्याचे टाळले. पक्षातील दुसऱ्या नेत्याने गौतम यांच्या वक्तव्यामुळे पक्षचे नेतृत्व नाराज झाले होते. एनडीएला ते वक्तव्य अडचणीचे ठरले होते. त्यामुळे हा निर्णय घेतल्याचे सांगितले.

कोण आहेत कमल गौतम ?

कमल गौतम राष्ट्रीय लोकदलाचे प्रवक्ते होते . फेसबुक प्रोफाइलवर त्यांचे 8 हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत. त्यांचे सोशल मीडिया अकाऊंट हिंदू समाजाशी संबंधित पोस्टने भरलेले आहे. त्यांची प्रत्येक पोस्ट हिंदुत्वाशी निगडित आहे. कमल गौतम हिंदुत्वाच्या मुद्द्यांवर उत्कटतेने बोलतात. अनेक हिंदू संघटनांशी संबंधित कमल गौतम हे हिंदू जागरण मंचचे माजी राज्य सरचिटणीस राहिले आहेत. मूळचे बिलासपूरचे असलेले कमल गौतम हे व्यवसायाने सरकारी शिक्षक आहेत.

गेल्या वर्षी चंबा येथील मनोहर हत्याकांडाच्या वेळी त्यांनी रॅली काढून सरकारवर अनेक प्रश्न उपस्थित केले होते. यानंतर त्यांना गेल्या वर्षीच निलंबित करण्यात आले होते. त्यावेळी कमल गौतम या बिलासपूर जिल्ह्यातील बलोही येथील सरकारी माध्यमिक विद्यालयात ते शिक्षक म्हणून कार्यरत होते.

 

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!