Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MarathawadaNewsUpdate : संविधान प्रतीकाची मोडतोड , परभणीत आंदोलनाला हिंसक ववळण ….

Spread the love

परभणी : परभणीतील डॉ . बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोरील  संविधानाच्या प्रतीकाची काल मोडतोड झाल्यामुळे परभणीतील वातावारण हिंसक झाले आहे. या प्रकाराच्या निषेधार्थ आंबेडकरी अनुयायांनी पुकारलेल्या परभणी जिल्हा बंद आंदोलनाला हिंसक वळण लागले. परभणी शहरात दगडफेक, रस्त्यांवर जाळपोळीचे प्रकार घडले. आंदोलकांवर नियंत्रणासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. तर, काही ठिकाणी अश्रूधुरांच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवले असून सध्या तणावपूर्ण शांतता आहे. कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

परभणी शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आहे. तिथेच भारतीय संविधानाची प्रत ठेवण्यात आली आहे. मंगळवारी सायंकाळी 5.30 वाजण्याच्या सुमारास एका अज्ञाताने संविधानाच्या प्रतीची विटंबना केली. ही माहिती समजताच परभणी शहरात तणावाची स्थिती निर्माण झाली. संतप्त झालेल्या आंबेडकरी अनुयायांनी मंगळवारी संध्याकाळी रास्ता रोको, रेल रोको आंदोलन केले. तर, आज परभणी बंदची हाक देण्यात आली. या प्रकरणाच्या सूत्रधारालाही अटक करावी अशी मागणी करण्यात आली.

आजच्या परभणी बंदला लोकांनी चांगलाच प्रतिसाद दिला. परभणीत कडकडीत बंद पाळण्यात आला. सकाळपासूनच शहरातील अनेक भागात बंद पाळण्यात आला. बाजारपेठा, दुकाने, शाळा-महाविद्यालयात शुकशुकाट दिसला. आजच्या बंद दरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी
जिल्ह्याच्या अनेक भागातही मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. परभणी बाजारपेठ सकाळपासून ठप्प होती.

आजच्या बंद दरम्यान अचानकपणे जमाव आक्रमक झाला. काही ठिकाणी रस्त्यांवर टायर जाळण्यात आले. तर, रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या वाहनाची नासधूस करण्यात आली. काही दुकानांच्या पाट्या तोडण्यात आल्या. काही ठिकाणी जमाव नियंत्रणात येत नसल्याने पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. तर, काही ठिकाणी सौम्य लाठीमार केला.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!