Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

NCPNewsUpdate : राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी अजित पवार यांची निवड

Spread the love

मुंबई : राज्यभरात सुरु असणा-या विधानसभा निवडणुकीचा निकाल काल जाहीर झाला. यामध्ये घवघवीत यशाने महायुतीचे सरकार विजयी झाले आहे. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधील सर्व राजकीय उमेदवारांनी भरघाेस मतांनी यश मिळवले आहे. अशातच उद्या नव्या सरकारचा शपथविधी देखील हाेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, आज मुंबईत राष्ट्रवादीच्या आमदारांची पार पडलेल्या बैठकीमध्ये राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी अजित पवारांची निवड झाली आहे.

दरम्यान, मविआचा पराभव करत महायुतीला या निवडणुकीत 220 पेक्षा जास्त जागांवर यश मिळाले आहे. या निवडणुकीत अजित पवार गटाला देखील चांगलं यश मिळाले आहे. अजित पवार गटाने या निवडणुकीत केवळ 53 ठिकाणी उमेदवार दिले हाेते. त्यापैकी तब्बल 41 जागांवर अजित पवार गटाच्या उमेदवारांचा विजय झाला आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!