उद्धव ठाकरेंचा घणाघात, ’’छत्रपती शिवरायांचा भगवा झेंडा मावळ्यांच्या हाती शाेभून दिसताे, दराेडेखाेरांच्या नाही … ’’
बुलढाणा : जयश्री शेळकेंच्या प्रचारार्थ आज बुलढाण्यात उद्धव ठाकरेंनी सभा घेतली. या सभेत त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा झेंडा मावळ्यांच्या हाती शाेभून दिसताे दराेडेखाेरांच्या नाही असे म्हणत महायुतीवर आणि भाजपावर जाेरदार टीका केली. तसंच मागच्या वेळी गद्दारांवर विश्वास ठेवला आणि चूक केली त्याबद्दल माी मागताे असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
’’तुम्ही सगळे मिळून जयश्रीताईंना आमदार करा. आपले बहुमत आल्यानंतर जालिंदरला आमदार करण्याचे काम माझे आहे. अशी माणसे हल्ली सापडत नाहीत. जालिंदरने संपूर्ण तयारी केली हाेती. त्याने फक्त माझा आदेश ऐकला आणि ताे थांबला. त्याची जबाबदारी मी आता घेतली आहे. माझ्याकडे फसवाफसवी नाही. थाेतांड नाहीत. मला शिवसेनाप्रमुखांनी सांगितले हाेते बाकी सगळ्या गाेष्टी जातात आणि परत येतात. ट्रम्पही हरले हाेते परत निवडून आले. आपण शब्द दिला की काही वाट्टेल ते झाले तरी शब्द पडू द्यायचा नाही. ही निवडणूक शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी हे सगळे मित्रपक्ष आहेत. आपल्या विराेधात सगळे महाराष्ट्र द्राेही आहेत.’’ असे उद्धव ठाकरे म्हणाले.
हाेय मागच्या वेळी माझी चूक झाली….
छत्रपती शिवरायांचा झेंडा घेऊन नाचवत आहेत ते काही सगळेच मावळे नाहीत. गेल्या वेळी आपण चूक केली. मी निवडणुकीच्या प्रचारात फिरतो आहे तर पाहिलं की प्रत्येक ठिकाणी आपल्या विराेधात आपला गद्दार उभा राहिला आहे. साहजिकच आहे ही चूक माझी आहे कारण यांना तिकिट विश्वास ठेवून मी दिलं हाेतं. माझ्यावर विश्वास ठेवून तुम्ही त्या गद्दारांना निवडणून दिलं हाेतं. आता त्या चुकीची पुनरावृत्ती करणार नाही.
छत्रपतींचा भगवा दराेडेखाेरांच्या हाती शाेभून दिसत नाही
छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळे निर्माण केले हाेते. छत्रपती शिवरायांचा जाे भगवा झेंडा आहे ताे मावळ्यांच्या हातात शाेभताे दराेडेखाेरांच्या हातात शाेभून दिसत नाही. आपल्या पक्षावर दराेडा घातला. चाळीस जणांची टाेळी आली दराेडा घालून पक्ष चाेरुन नेला. आता म्हणत आहेत की हा पक्ष आमचा आहे. गद्दारच आहेत ते, खाेकेबाज आणि धाेकेबाज आहेत. पन्नास खाेके आता नाॅट ओके. आता यांनी एवढं कमावलं आहे की त्यांना हरवलं तरी काही फरक पडत नाही एवढं त्यांनी कमावलं आहे. असाही आराेप उद्धव ठाकरेंनी केला. 50 खाेके तर आता सुट्टे पैसे झाले आहेत त्यांच्यासाठी असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
चाेर दराेडेखाेरांना घेऊन आमच्यावर कसे चालून येता?
भाजपावाल्यांची आणि माेदींची आम्हाला कमाल वाटते आहे की तुम्ही चाेर-दराेडेखाेरांना घेऊन आमच्यावर कसे काय चालून येत आहात? भाजपाला कुणी ओळखत नव्हतं तेव्हा आम्ही तुम्हाला साथ दिली. शिवसेना नसती तर माेदीही पंतप्रधान झाले नसते आणि देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले नसते. हिंदुत्वाचा भ्रम तुम्ही निर्माण केलात. वर गेल्यानंतर आम्हाला लाथा घालू लागलात? ठीक आहे तुमचं तंगडं धरुन तुम्हाला महाराष्ट्राच्या बाहेर भिरकावून दिलं नाही तर मी छत्रपती शिवाजी महाराज की जय हे बाेलणार नाही. असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
बाहेरच्या राज्यातून या लाेकांना प्रचारासाठी लाेक आणावे लागत आहेत. यांनी काल परवाकडे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री विदर्भात फिरून गेले. एक नारा देऊन गेले की ‘बटेंगे ताे कटेंगे’ कुणाची हिंमत आहे असं करण्याची? आम्हाला काय शिकवत आहात? असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला. तसंच माझ्या बराेबर हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, बारा बलुतेदार सगळे आमच्या पाठिशी आहेत. याेगीजी तुमच्या महायुतीकडे बघा. तुमच्या गुलाबी जॅकेटवाले म्हणाले बाहेरच्या लाेकांनी येऊन लुडबूड करु नये. महायुतीत एकवाक्यता नसेल तर तुम्ही आम्हाला कशाला शिकवता? असाही प्रश्न उद्धव ठाकरेंनी विचारला.