Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MahayutiNewsUpdate : भाजपचा सावध पवित्रा , रामदास आठवले यांच्यासह मित्रपक्षांना सोडल्या 4 जागा….

Advertisements
Advertisements
Spread the love

नवी दिल्ली :  विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने सावध पवित्रा घेत आपल्या मित्र पक्षांना 4 जागा सोडल्या असल्याचे वृत्त आहे . आतापर्यंत  भाजपने १४६ जागांवर आपले  उमेदवार जाहीर केले आहेत. भाजपच्या नव्या यादीनुसार बडनेरा, गंगाखेड, कलिना आणि शाहूवाडी  हे चार  मतदारसंघ भाजपाने त्यांच्या मित्रपक्षांना सोडले आहेत. त्यामुळे महायुतीत भाजपाच्या जागांची संख्या आता १५० झाली आहे.

भाजपच्या ट्विटनुसार , बडनेरा ही जागा रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षासाठी सोडण्यात आली आहे. तर गंगाखेड महादेव जानकरांच्या राष्ट्रीय समाज पक्षासाठी सोडली आहे.  रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पक्षासाठी कलिनाची जागा सोडली आहे. तर शाहूवाडी मतदारसंघ हा विनय कोरे यांच्या जनसुराज्य पक्षाला सोडला आहे. अशाप्रकारे ४ जागा भाजपाने मित्रपक्षांना सोडल्याची अधिकृत माहिती समोर आली आहे.

Advertisements

महादेव जानकर यांच्या पक्षाचे  उमेदवार घोषित ….

काही दिवसांपूर्वी महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाने महायुतीमधून बाहेर पडून राष्ट्रीय समाज पक्ष महाराष्ट्रातील सर्व २८८ जागांवर स्वबळावर निवडणूक लढणार असल्याची माहिती महादेव जानकर यांनी दिली आहे. राष्ट्रीय समाज पक्ष हा २०१४ च्या आधीपासून भाजपासोबत महायुतीमध्ये होता. अनेकदा दोन्ही पक्षांमध्ये मतभेद झाले तरी जानकर महायुतीसोबत कायम होते. लोकसभा निवडणुकीत महादेव जानकर यांना महायुतीने परभणी लोकसभा मतदारसंघामधून उमेदवारी दिली होती. मात्र त्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. आता रासपला विधानसभेची एक जागा सोडल्यामुळे महादेव जानकर पुन्हा महायुतीत परतणार का अशी चर्चा सुरू झाली आहे.

Advertisements
Advertisements

दरम्यान, महायुतीत रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पक्षाला २ जागा सोडण्यात आल्याची माहिती आहे. त्यात भाजपाकडून  कलिना मतदारसंघ तर शिवसेना शिंदे गटाकडून धारावी मतदारसंघ सोडण्यात आले असल्याचे सांगण्यात येत आहे. रामदास आठवले यांनी पत्रकार परिषद घेत कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिलेत. विधानसभेच्या २ जागांसह भविष्यात काही महामंडळेही देण्याचे आश्वासन रामदास आठवलेंना महायुतीकडून देण्यात आले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!