सांगोल्याकडे जाणाऱ्या एका गाडीत गाडीत आढळली 5 कोटींची रोकड

पुणे : विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर राज्यात सर्वत्र आदर्श आचारसंहितेचा संहितेचा अंमल सुरू झाल्यानंतर पुणे जिल्ह्यातील भोरजवळ बड्या नेत्याशी संबंधित असलेल्या कारमध्ये मोठी रक्कम जप्त करण्यात आली आहे. राजगड पोलीस स्टेशनच्या हद्दीत नाकाबंदीच्या वेळेस एका गाडीत 5 कोटींची रोकड आढळून आली आहे. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पोलिसांनी अनेक ठिकाणी नाकाबंदी सुरू केली आहे. याच नाकाबंदीच्या वेळेस सांगोल्याकडे जाणाऱ्या एका गाडीत ही रोख रक्कम पोलिसांना आढळून आली आहे. इन्कम टॅक्स व संबंधित विभागांना या बाबतची माहिती देण्यात आली आहे. पुण्यात आज संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, पुणे ग्रामीण पोलिसांनी खेड-शिवापूर टोलनाक्यावर नाकाबंदी दरम्यान पकडली आहे. इनोव्हा क्रिस्टा ही कार आहे.ही कार सांगोल्याची आहे. नलवडे नावाच्या व्यक्तीची ही गाडी आहे. या कारमधून ही रोकड सांगोल्याला नेण्यात येणार होती. ही कार सत्ताधारी नेत्यांच्या संबंधित व्यक्तीची आहे. पुणे ग्रामी पोलिस या सर्व प्रकरणात गुन्हा दाखल करण्याचे काम करत आहेत. निवडणूक आयोगाचे अधिकारी देखील त्या ठिकाणी दाखल झाले आहेत. काही वेळात याबाबत मोठा खुलासा होण्याची शक्यता आहे.
संजय राऊतांचे अप्रत्यक्षपणे शहाजी पाटलांवर गंभीर आरोप
संजय राऊत ट्वीटरवर लिहितात, मिंधे टोळीतील एका आमदाराच्या गाडीत खेड शिवापूर टोल नाक्यावर 15 कोटी सापडले! हे आमदार कोण? काय झाडी…काय डोंगर…मिंधे यांनी निवडणुकीसाठी प्रत्येक उमेदवारास 75 कोटी पाठवले. 15कोटी चा हा पहिला हप्ता!काय बापू..किती हे खोके? असा सवालही संजय राऊत यांनी केलाय.