Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या, तीन हल्लेखोर गजाआड….

Spread the love

मुंबई : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि राज्याचे माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार झाला असून त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे. आमदार झिशान सिद्दिकी यांच्या कार्यालयासमोरच, बांद्रा पूर्वेत खेरवाडी परिसरात ही घटना घडली आहे. तीन अज्ञात व्यक्तींनी बाबा सिद्दिकी यांच्यावर तीन गोळ्या झाडल्या असून त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बाबा सिद्दिकी यांना वाय दर्जाची सुरक्षा प्रदान करण्यात आली होती. पंधरा दिवासांपूर्वी त्यांना जीवे मारण्याची धमकी आली होती. आता त्यांच्यावर गोळीबार झाल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला आहे. तोंडाला रुमाल बांधून हे अतिरेकी आले होते.

या घटनेनंतर लिलावती रुग्णालयाच्या परिसरात आणि वांद्रे पूर्व परिसरात वाढती गर्दी लक्षात घेता,  पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. दरम्यान वरिष्ठ पोलिस अधिकारीही घटनास्थळी पोहोचले असून तपास सुरू झाला आहे.

बाबा सिद्दिकी कोण होते ?

बाबा सिद्दिकी हे वांद्रे पूर्व परिसरातील बडे नेते असून त्यांनी राज्याचे मंत्री म्हणूनही काम केलं आहे. त्यांचे पुत्र झिशान सिद्दिकी हे वांद्रे पूर्व मतदारसंघातून आमदार आहेत. लोकसभेच्या आधी बाबा सिद्दिकी यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला होता.
मुंबईतील काँग्रेसच्या नेत्यांपैकी महत्त्वाचे नेते समजले जाणाऱ्या बाबा सिद्दीकी यांनी काहीच दिवसांपूर्वी राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये प्रवेश केला होता.

बाबा सिद्दीकी यांनी जवळपास 48 वर्ष काँग्रेस पक्षात कार्यरत होते. इतकेच नव्हे तर ते सलग तीन वेळा वांद्रे पूर्व या मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते.  बाबा सिद्दीकी यांच्या इफ्तार पार्टीचीही बरीच चर्चा असायची. बॉलिवुडमधले मोठ मोठे सेलिब्रेटी हे बाबा सिद्दीकी यांच्या इफ्तार पार्टीला हजेरी लावायचे. दरम्यान बाबा सिद्दीकी यांच्यावरील गोळाबारीच्या घटनेमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

बाबा सिद्दीकी यांनी 1977 मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यांनी त्यावेळच्या विविध विद्यार्थ्यांच्या चळवळींमध्ये नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडियाच्या मुंबई चॅप्टरचे सदस्य म्हणून भाग घेतला,जी काँग्रेसची विद्यार्थी शाखा होती. 1980 मध्ये ते वांद्रे युवक काँग्रेसच्या वांद्रे तालुक्याचे सरचिटणीस बनले आणि पुढील दोन वर्षांत त्यांची अध्यक्षपदी निवड झाली.1988 मध्ये ते मुंबई युवक काँग्रेसचे अध्यक्ष झाले. चार वर्षांनंतर त्यांची मुंबई महानगरपालिकेत नगरपरिषद म्हणून निवड झाली आणि पाच वर्षांनंतर त्यांची पुन्हा या पदावर निवड झाली.

वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघातून 1999 मध्ये ते आमदार झाले. 2004 आणि 2009 मध्ये ते पुन्हा निवडून आले. त्यांनी अन्न व नागरी पुरवठा, कामगार राज्यमंत्री आदी खातीदेखील सांभाळली आहेत. बाबा सिद्दीकी हे 1992 आणि 1997 च्या मुंबई महापालिका निवडणुकीत नगरसेवक म्हणून विजयी झाले होते.

2000-2004 या कालावधीत काम करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने म्हाडा मुंबई बोर्डाचे अध्यक्ष म्हणून सिद्दीकी यांची नियुक्तीही केली होती.बाबा सिद्दीकी हे मुंबई काँग्रेस आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या समितीवर महत्त्वाच्या पदावर होते.2014 च्या विधानसभा निवडणुकीत बाबा सिद्दीकी यांचा अशिष शेलार यांनी पराभव केला होता.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!