Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

मनोज जरांगे यांच्या दसरा मेळाव्याला अखेर पोलिसांची सशर्त परवानगी….

Advertisements
Advertisements
Spread the love

बीड : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या दसरा मेळाव्याला अखेर पोलीस प्रशासनाकडून परवानगी मिळाली आहे. गेल्या नऊ दिवसांपासून मराठा समन्वयकांनी परवानगी मागून सुद्धा पोलीस प्रशासनाकडून परवानगी देण्यात येत नसल्याचे सांगण्यात येत होते.  दरम्यान दसरा मेळाव्यासाठी मनोज जरांगे पाटील यांना प्रशासनाने 16 अटी ठरवून दिल्याचे सांगितले आहे. पार्किंगची व्यवस्था आणि दसरा मेळाव्याला येणाऱ्यांची आसन व्यवस्था करण्याच्या अटी शर्थीने अखेर नारायण गडवरील मनोज जरांगे पाटील यांच्या दसरा मेळाव्याला पोलीस प्रशासनाने परवानगी दिली आहे.

मनोज जरांगे पाटील म्हणाले, सांस्कृतिक कार्यक्रम आहे त्यामुळे परवानगीचा काही विषय येणारच नव्हता. ऐकायला मिळाले होते की नाही म्हणून पण एस पी साहेब आणि कलेक्टर साहेब चांगले आहेत. परवानगी तर मिळणारच होती, गोरगरिबांचा दसरा मेळावा आहे. मराठा बांधवांना विनंती आहे की सगळ्यांनी शांतता आणि शांततेत जायचे आहे. लोकांचा आकडा सांगता येणार नाही.परंतु 10 आले काय आणि 1000 आले का लाख आले काय तरी कार्यक्रम होणार आहे. मात्र लोक घरी थांबत नाही बीड जिल्ह्यातील एकही माणूस घरी थांबणार नाही.

Advertisements

मेळाव्याला हेलिकॉप्टरने एन्ट्री करावी, समाजाची मागणी आहे मान्य करणार का?
भावना होत्या समाज बांधवांची हजारोच्या संख्येने गडावर म्हणत होते हेलिकॉप्टरने जायचे .मात्र आपण गरिबांचा लढा लढतो आपले बांधव त्यात बसून अधिकारी होऊन आले पाहिजेत. समाज मोठा करण्याचे माझे स्वप्न आहे. मी भूशाणात जगणारा नाही ,मोठेपणात वागणारा नाही. समाजाचे म्हणणे होते गडावर गर्दी होणार आहे. गर्दीतून तुम्हाला येता येणार नाही. तरीही एकही हेलिकॉप्टर नको ते मी रद्द केले आहे.

Advertisements
Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!