Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraVidhansabhaElection : केंद्रीय निवडणूक आयोगाचे पथक आज आणि उद्या महाराष्ट्रात

Spread the love

मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील संवेदनशील क्षेत्र व निवडणुकी संदर्भात घ्यावयाचा आढावा घेण्यासाठी केंद्रातील निवडणूक आयोगाचे पथक उद्या २७ सप्टेंबरला महाराष्ट्राच्या दोन दिवसीय दौऱ्यावर येत आहे. या दौऱ्यात राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतला जाणार आहे.

राज्यातील विधानसभेची मुदत २६ नोव्हेंबर २०२४ पर्यंत असून, त्याआधी राज्यातील विधानसभेची निवडणूक झाली पाहिजे. यासाठी राज्य निवडणूक आयोग त्या दृष्टीने कामाला लागला आहे. राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघातील मतदार यादी अद्यावत करण्यापासून, निवडणुकीसाठी लागणारे शासकीय, निम शासकीय कर्मचारी त्याचबरोबर पोलीस यंत्रणा होमगार्ड व निवडणुकीसाठी लागणारी मतदान केंद्र, त्यासाठी लागणारी वाहने याची परिपूर्ण माहिती राज्य निवडणूक आयोगाने संकलित केली आहे.

या दौऱ्यात केंद्रीय निवडणूक आयोगाच्या पथकाकडून राज्यातील राज्य निवडणूक आयोगाचे अधिकारी , राज्याचे पोलीस महासंचालक, राज्याचे मुख्य सचिव गृहसचिव, मुंबई पोलीस आयुक्त ,महसूल आयुक्त, परिवहन आयुक्त, होमगार्डचे महासंचालक यांच्यासह राज्यातील सहा विभागातील सहा विभागीय आयुक्त यांच्याशी ते बैठका घेतल्या जातील . त्यानंतर राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांशी ते व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारा अथवा गरज पडल्यास राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना बैठकीसाठी मुंबईत पाचारण करतील व त्यांच्याकडून मतदान केंद्रनिहाय आढावा घेतला जाणार आहे.

दरम्यान निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेऊन केंद्रीय निवडणूक आयोगाचे पथक राज्याच्या दौऱ्यावरून परत गेल्यानंतर साधारणतः आठ दिवसात केंद्रीय निवडणूक आयोग महाराष्ट्रातील विधानसभेची निवडणूक जाहीर करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!