Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharshtraPoliticalNewsUpdate : आगामी विधानसभा निवडणुकीबाबत भाजपचा मोठा निर्णय ….

Spread the love

मुंबई :  आगामी विधानसभा निवडणुकीच्या नियोजनात भाजपाने आघाडी घेतली असून राज्यातील भाजप उमेदवारांच्या तिकीट वाटपाचे सर्वाधिकार देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले आहेत. रविवारी झालेल्या भाजप कोअर कमिटीच्या बैठकीत निर्णय झाल्याची माहिती आशिष शेलार यांनी दिली आहे. लोकसभेत मोठा फटका बसल्यानंतर विधानसभा निवडणुकीसाठी  भाजपने हा मोठा निर्णय घेतला आहे.

भाजपा प्रदेश कार्यालयात कोअर कमिटीची बैठक रविवारी पार पडली. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र विधानसभा प्रभारी भूपेद्र यादव, सह संघटन मंत्री शिवप्रकाश, मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, सरचिटणीस विनोद तावडे, पंकजा मुंडे उपस्थित होते. विधानसभा निवडणुकीसंदर्भातील तयारी, आढावा आणि नियोजन या बैठकीत ठरले आहे.

 निवडणुकीसाठी संपूर्ण अधिकार देवेंद्र फडणवीसांना…

या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना आशिष शेलार म्हणाले, राज्यातील बहुतेक जागांची निश्चिती बैठकीत करण्यात आली आहे. देवेंद्रजींच्या नेतृत्वात त्यांना संपूर्ण अधिकार देऊन सुरू करण्याची भूमिका पक्षाने स्पष्ट केली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाच्या आणि राजकीय संस्कृतीला काळीमा भासण्याचे काम सर्वात प्रथम कोणी केला असेल तर ते संजय राऊत आणि उबाठा सेना आणि मग उद्धवजींनी केले आहे. पहिलं तर मतं आमच्याबरोबर घ्यायची आणि सत्ता दुसऱ्याबरोबर स्थापन करायची .

कार्यकर्त्यांसोबत स्नेहभोजन….

प्रत्येक विधानसभामध्ये जिथे भाजपचे आमदार आहेत तिथे सर्व आमदार कार्यकर्त्यांसोबत स्नेहभोजन आणि कार्यकर्त्यांच्या सूचना ऐकणं याबद्दल नियोजनाचा भाग पूर्ण झाला. राज्यातील संपूर्ण 288 जागांवर संघटनेच्या मंडल युनिटवर राजकीय प्रस्ताव राज्य सरकारच्या अभिनंदन असे पारित करून गाव पातळीपर्यंत पोहोचवणे आणि त्यामध्ये जनसहभाग करणे याचा पंधरा दिवसांच्या पुढचा कार्यक्रम नियोजित करण्यात आला, असे आशिष शेलार म्हणाले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!