Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharshtraPoliticalNewsUpdate : राज्यातील विधानसभा निवडणुकांचे सर्वच राजकीय पक्षांना वेध !! केंव्हा होईल निवडणूक ?

Advertisements
Advertisements
Spread the love

मुंबई : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकानंतर  राज्यात सर्वच पक्षांना आता विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. या निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना होण्याची शक्यता असली तरी राज्यात तिसऱ्या आघाडीचे प्रयत्नही केले जात आहेत . सध्या अस्तित्वात असलेल्या विधानसभेचा कार्यकाळ संपण्यासाठी काहीच महिने शिल्लक आहेत. महाराष्ट्रातील विधानसभेची मुदत २६ नोव्हेंबर या दिवशी संपणार आहे.

दरम्यान महाराष्ट्राबरोबरच हरियाणा राज्यातील विधानसभेची मुदतही ३ नोव्हेंबरपर्यंत आहे. त्यामुळे  या दोन राज्यातील विधानसभा निवडणुकीचे नियोजन निवडणूक आयोग लवकरच जाहीर करेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. नियमानुसार विधानसभेची मुदत संपण्याआधी किंवा त्या तारखेच्या दुसऱ्या दिवशी नवी विधानसभा अस्तित्वात येणे गरजेचे असते. त्याप्रमाणे  महाराष्ट्रात आणि हरियाणात दिवाळीपूर्वी किंवा ऑक्टोबरच्या तिसऱ्या आठवड्यात नवीन विधानसभा अस्तित्वात येणे आवश्यक आहे. महाराष्ट्र आणि हरियाणाची विधानसभा निवडणूक २००९ पासून एकाच वेळी होत आहे.

Advertisements

विशेष म्हणजे या दोन्हीही राज्यांच्या विधानसभांची मुदत २३ दिवसांच्या अंतराने संपत असल्यामुळे नियमानुसार एकत्र निवडणूक घेणे आवश्यक आहे. यंदा दिवाळी २९ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर या कालावधीत आहे. सणासुदीच्या काळात निवडणुका घेतल्या जात नाहीत. वास्तविक दिवाळीनंतर राज्यात विधानसभेची निवडणूक घेण्यास बराच कालावधी मिळतो.मात्र हरियाणामुळे महाराष्ट्रातही आधी निवडणूक घ्यावी लागणार आहे. २०१९ मध्ये महाराष्ट्र आणि हरयाणामध्ये २१ ऑक्टोबरला मतदान झाले होते. यंदाही याच तारखेच्या आसपास, २१ ते २६ ऑक्टोबरच्या आठवड्यात मतदान होऊ शकेल.

Advertisements
Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!