धक्कादायक : संतप्त सासऱ्याचे कोर्टातच कांड , जावयाला गोळ्या घालून ठार केले !!
चंदीगड : येथील न्यायालायात सुनावणीसाठी आलेल्या जावयावर गोळ्या झाडून त्याला ठार केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. यांच्यात कौटुंबिक वाद सुरु होता. त्याच्या सुनावणीसाठी हे दोन्हीही पक्ष न्यायालयात आले होते. यादरम्यान पंजाब पोलिसांचे माजी एआयजी मलविंदर सिंग सिद्धू यांनी त्यांच्या जावयावर गोळीबार केला, ज्यात त्यांचा मृत्यू झाला, मृत जावई कृषी विभागात आयआरएस होते.
या तारखे दरम्यान आरोपी सासरा आणि जावई यांच्यात संभाषण चालू होते . त्यावेळी आरोपी सासऱ्याने बाथरूमला जायचे अआहे असे सांगितले तेंव्हा मी रस्ता दाखवतो असे सांगून जावई बाहेर निघाला आणि दोघेही कोर्टाच्या खोलीतून बाहेर पडले.
ही संधी साधून संतप्त सासऱ्याने जावयावर पाच राउंड फायर केले त्यातील दोन गोळ्या तरुणाला लागल्या. एक गोळी आतल्या खोलीच्या दरवाजाला लागली. दोन गोळ्या रिकाम्या गेल्या . या गोळीबाराचा आवाज येताच कोर्टात एकच गोंधळ उडाला. घटनास्थळी पोहोचलेल्या वकिलांनी आरोपीला पकडून एका खोलीत बंद केले आणि पोलिसांना माहिती दिली.
यानंतर जखमीला सेक्टर 16 रुग्णालयात नेण्यात आले मात्र वाटेतच त्याचा मृत्यू झाला. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि खोलीत बंद असलेल्या आरोपीला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेले.