Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री शिंदे आणि शरद पवार यांची भेट …

Spread the love

मुंबई : सध्या मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील वातावरण तापले आहे. काही दिवसांपूर्वी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी खासदार शरद पवार यांची भेट घेत सध्या राज्यातील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला जात आहे. तुम्ही आरक्षणाच्या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी केली होती. विशेष म्हणजे शरद पवार यांनीदेखील या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला होता. त्यांनंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांची मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर पंधरा मिनिटे एकत्रित चर्चा झाली आहे.

एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांच्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून 15 मिनिटे चर्चा झाली आहे. या चर्चेत एकनाथ शिंदे यांनी शरद पवार यांना सरकारने मराठा आरक्षणप्रश्नी आतापर्यंत काय प्रयत्न केले, याबाबत माहिती दिली. शरद पवार यांनी याआधी सरकार मनोज जरांगे किंवा लक्ष्मण हाके यांना काय आश्वासन देत आहे याबाबत विरोधी पक्षाला काहीच माहिती नाही असे म्हटले होते. त्यानंतर आता शिंदे यांनी सरकारने मराठा आरक्षणासाठी आतापर्यंत काय काय केले आहे, याची माहिती शरद पवार यांना दिली आहे. या भेटीनंतर आता विरोधी पक्ष काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

याआधी मराठा आणि ओबीसी आरक्षणासंदर्भात चर्चा करण्यासाठी 9 जुलै रोजी सर्वपक्षीय बैठक बोलवली होती. विरोधी पक्षाने मात्र या बैठकीवर बहिष्कार टाकला होता. या बैठकीनंतर पावसाळी अधिवेशनात चांगलीच खडाजंगी झाली होती. विरोधकांनी या बैठकीवर बहिष्कार टाकल्यामुळे सत्ताधारी आमदार आक्रमक झाले होते. त्यानंतर आता एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांच्यात मराठा आरक्षणासंदर्भात चर्चा झाली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!