Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

मोठी बातमी : मराठा विद्यार्थ्याना मोठा दिलासा , जात वैधता प्रमाणपत्रासाठी आता सहा महिन्याची मुदत

Spread the love

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विद्यार्थ्यांना दिलासा देणारा मोठा निर्णय घेतला आहे. २०२४-२५ मध्ये अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांना विविध शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी अर्ज केल्याच्या दिनांकापासून सहा महिन्याच्या कालावधीपर्यंत मुदत देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता विशेषत: मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र मिळण्यात येणाऱ्या अडचणीही दूर होतील.

दरम्यान एका अभियांत्रिकीत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थिनीने याबाबत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याकडे जात पडताळणी बाबत अत्यंत रडकुंडीला येत आपली अडचण मांडली होती. ही अडचण लक्षात घेत सरकारने जात वैधता प्रमाणपत्रासाठी सहा महिन्याचा अवधी द्यावा अशी मागणी केली होती. यावेळी जरांगे यांनाही अश्रू अनावर झाले होते . हा प्रश्न लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी ही अडचण दूर केल्यामुळे मराठा विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!