Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या विरोधात कारवाई , यूपीएससीकडून परिपत्रक जारी….

Spread the love

नवी दिल्ली : वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या विरोधात अखेर यूपीएससीने कारवाई केली असल्याचे वृत्त आहे. या वृत्तानुसार यूपीएससीने पूजा खेडकर यांच्या विरोधात गुन्हा केला आहे. तसेच त्यांना कारणे दाखवा नोटीसदेखील बजावण्यात आली आहे. यूपीएससीने परिपत्रक जारी करत यासंदर्भात माहिती दिली आहे. त्यामुळे पूजा खेडकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

यूपीएससीने जारी केलेल्या परिपत्रकानुसार, पूजा खेडकर यांनी परीक्षा नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. यूपीएससीने प्रशिक्षणार्थी आयएएस पूजा खेडकर यांच्यावरील आरोपाची सखोल चौकशी केली असून त्यांनी परीक्षा नियमांचे उल्लंघन केल्याचं सिद्ध होत असल्याचे यूपीएससीने या परिपत्रकात म्हटलं आहे. याशिवाय पूजा खेडकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांची उमेदवारी का रद्द करू नये? असं प्रश्न विचारत त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याचंदेखील या परिपत्रकात सांगण्यात आलं आहे.

पूजा खेडकर यांनी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात केलेल्या गैरवर्तनासंदर्भात पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी अतिरिक्त मुख्य सचिव नितीन गद्रे यांना अहवाल पाठवला होता. यानंतर पूजा खेडकर यांची पुण्याहून वाशिम येथे बदली करण्यात आली आहे. उद्यापर्यंत त्यांना मसुरी येथे हजर होण्याचे आदेश आधीच देण्यात आले आहेत.

पूजा खेडकर या सध्या चांगल्याच चर्चेत आहेत. यूपीएससी परीक्षा देताना त्यांनी दृष्टीदोष आणि मानसिक आजार असल्याचं खोटं प्रमाणपत्र सादर केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. पूजा खेडकर यांनी यूपीएससी परीक्षेत देशभरातून ८४१ क्रमांक मिळाला होता. आश्चर्याची बाब म्हणजे यूपीएससी परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर केंद्रीय लोकसेवा आयोगाने त्यांचा आजार सिद्ध करण्यासाठी आरोग्य तपासणी करण्यास सांगितले होते. मात्र सहावेळा नोटीस देऊनही खेडकर वैद्यकीय तपासणीसाठी उपस्थित राहिल्या नव्हत्या.

काही दिवसांनी पूजा खेडकर यांनी दुसऱ्याच रुग्णालयात एमआरआय चाचणी अहवाल काढून तो लोकसेवा आयोगाकडे सादर केला. मात्र लोकसेवा आयोगाने हा अहवाल फेटाळून लावला होता. त्यानंतर आयोगाने खेडकर यांच्या नियुक्तीला कॅट (केंद्रीय प्रशासकीय लवाद) मध्ये आव्हान दिले होते. २३ फेब्रुवारी २०२३ रोजी खेडकर यांच्याविरोधात निकाल दिला. मात्र काही काळाने त्यांचा एमआरआय अहवाल स्वीकारला गेला आणि त्यांची आयएएस अधिकारी म्हणून पुन्हा नियुक्ती करण्यात आली होती.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!