Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MSEDCL NewsUpdate : सामान्य ग्राहकांच्या घरात विजेचे स्मार्ट प्रीपेड मीटर लावण्याबाबत अखेर MSEDCL ने घेतला मोठा निर्णय !!

Spread the love

कोल्हापूर : महावितरणने राज्यातील सर्व ग्राहकांच्या घरी स्मार्ट प्रीपेड मीटर लावण्याची घोषणा काही दिवसापूर्वी केली होती. याला जनतेने तीव्र विरोध केला. दरम्यान महाविकास आघाडीनेही या निर्णयाचा कडाडून विरोध केला. त्यानंतर राज्याचे ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले की, स्मार्ट प्रीपेड मीटर्सचा निर्णय मागे घेण्यात आला आहे. मात्र सरकारकडून अशा पद्धतीचा आदेश जारी करण्यात आला नव्हता. तसेच महावितरणनेही याबाबत भूमिका स्पष्ट केली नव्हती. त्यामुळे महाविकास आघाडीने मागणी केली होती की महावितरणने स्मार्ट मीटरबाबतचा निर्णय तातडीने मागे घ्यावा. त्यावर महावितरणने आता सामान्य ग्राहकांच्या घरी प्रीपेड स्मार्ट मीटर बसवले जाणार नाहीत, असे जाहीर केले आहे.

याबाबत महावितरणने एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली असून त्यात म्हटले आहे की , महावितरणने महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या (MERC) मान्यतेनंतर ऊर्जा मंत्रालय (MOP), भारत सरकारच्या (Gol) सुधारित वितरण क्षेत्र योजनेमध्ये (RDSS) वाहिन्यांचे विलगीकरण, वितरण हानी कमी करणे, वितरण प्रणालीचे सक्षमीकरण आणि स्मार्ट मीटरिंग (Smart Metering) यांसारखे कार्यक्रम हाती घेतले आहेत. यामुळे महाराष्ट्रातील ग्राहकांना विश्वासार्ह आणि दर्जेदार वीजपुरवठा होण्यास मदत होईल. या योजनेद्वारे सिस्टीम मीटरिंग अंतर्गत सबस्टेशनमधील सर्व फीडरवर तसेच वितरण रोहित्रांवर (Distribution Transformer) आणि सर्व सरकारी कार्यालयांमध्ये स्मार्ट मीटर बसवण्यात येत आहेत. सर्वसामान्य ग्राहकांना मात्र प्रीपेड स्मार्ट मीटर बसविण्यात येणार नाहीत.

या संदर्भात कोल्हापूरमध्ये आमदार सतेज पाटील यांनी इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना सर्वसामान्य जनतेस स्मार्ट प्रीपेड मीटर बसवण्याची सक्ती करू नये असे निवेदन दिले होते . यावेळी शिवसेनेचे (ठाकरे गट) संजय पवार, विजय देवणे, काँग्रेसचे सचिन चव्हाण, राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) आर. के. पोवार, प्रताप होगाडे, विक्रांत पाटील, अमरीश घाटगे, जावेद मोमीन, चंद्रकांत पाटील, राजू सूर्यवंशी, बाबासाहेब देवकर यांच्यासह इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!