Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

आधी केला सत्कार मग डॉक्टरच्या तोंडाला फसले काळे , जरांगे यांच्या आंदोलनाच्या विरोधात केला होता अर्ज !!

Advertisements
Advertisements
Spread the love

औरंगाबाद : गेल्या काही महिन्यांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला विरोध करणाऱ्या एका डॉक्टराला छत्रपती संभाजीनगरमध्ये काळं फासण्यात आल्याची घटना घडली आहे. मनोज जरांगे यांनी अंतरवाली सराटीमध्ये केलेल्या आंदोलनाला विरोध केल्याच्या कारणावरून डॉक्टराच्या तोंडाला काळं फासण्यात आलं. डॉ.रमेश तारख यांनी मनोज जरांगे यांच्या अंतरवाली सराटीमधील आंदोलनाला विरोध केल्याचं मराठा आंदोलकांचं म्हणणं आहे.

मनोज जरांगे यांनी काही दिवसांपूर्वी अंतरवाली सराटीमध्ये आंदोलन केलं होतं. मात्र, या आंदोलनाच्या विरोधात डॉ.रमेश तारख यांनी प्रशासनाला अर्ज दिल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. डॉ.रमेश तारख यांनी आंदोलनाच्या विरोधात अर्ज दिल्याप्रकरणावरून काही मराठा आंदोलक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं आहे.

Advertisements

डॉ.रमेश तारख यांना आज काही मराठा आंदोलकांनी भेटण्यासाठी बोलावलं होतं. त्यानंतर डॉ.रमेश तारख यांचा सत्कार केला. मात्र, त्यानंतर डॉ.रमेश तारख यांच्या तोंडाला काळं फासलं. दरम्यान, यावरून छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठा आंदोलक पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राजकारण तापण्याची शक्यता आहे.

Advertisements
Advertisements

डॉ.रमेश तारख यांनी काय प्रतिक्रिया दिली?

“मला एकजणाचा फोन आला आणि सांगितलं की, आम्हाला पेंशंट दाखवायचं आहे. त्यानंतर ते बाहेर येऊन थांबले. त्यानंतर काहीवेळाने ते आतमध्ये आले आणि त्यांनी माझा सत्कार केला. यावेळी मी त्यांना विचारलं की सत्कार का केला. तर त्यांनी सांगितलं की तुमचा वाढदिवस आहे. त्यानंतर मी त्यांना सांगितलं की आज माझा वाढदिवस नाही. त्यानंतर त्यांनी मला काळं फासलं”, अशी प्रतिक्रिया डॉ.रमेश तारख यांनी दिली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!