Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : …. आणि CISFच्या महिला रक्षकाने भाजपची नवनिर्वाचित खासदार कंगना रणौतच्या कानाखाली वाजवली !! काय आहे कारण ?

Spread the love

चंदीगड : चंदीगड विमानतळावर CISFच्या महिला रक्षकाने भाजपची नवनिर्वाचित खासदार , बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतच्या कानाखाली वाजवली असल्याचे धक्कादायक वृत्त आहे. CISFच्या त्या माहिला रक्षकावर तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी कंगनाने केली आहे. दरम्यान कंगना रणौत हिने शेतकरी आंदोलनाच्या विरोधात वक्तव्य केल्यामुळे संतापलेल्या महिला CISF ने कंगनाच्या कानाखाली लगावली. कुलविंदर कौर असे कंगनाला मारणाऱ्या CISFच्या महिला रक्षकाचे नाव आहे.

कंगना रणौत यंदाच्या लोकसभा निवडणुकांच्या रिंगणात हिमाचल प्रदेशच्या मंडी येथून निवडून आली आहे. अनेक वर्ष काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या मंडीमधून कंगनाने हा विजय मिळवला आहे. लोकसभा निवडणूक जिंकल्यानंतर कंगना रणौत दिल्लीला रवाना झाला होती. चंदीगड एअरपोर्टवर पोहोचताच कंगनाबरोबर हा धक्कादायक प्रकार घडला.

चंदीगड एअरपोर्टवर हा प्रकार घडण्याआधी “मंडीची खासदार, दिल्ली कॉलिंग, पार्लमेंटच्या दिशेने ” असे म्हणत कंगनाने तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. आईचे आशिर्वाद घेऊन कंगना दिल्लीच्या दिशेने रवाना झाली. चंदीगड एअरपोर्टवरचा हा कंगनाचा व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात ती प्रचंड संतापल्याचे दिसत आहे. सोबतच्या लोकांनी हे भांडण सोडवल्यानंतर ती दिल्लीकडे रवाना झाली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!