Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CongressNewsUpdate : भगवा दहशतवाद , देशाचा गृहमंत्री म्हणून मी बोललो , माझ्या हातावर हनुमान , मग मी नॉन हिंदू आहे का ? : सुशीलकुमार शिंदे

Spread the love

सोलापूर : माझ्या हातावर हनुमान गोंदवलेला आहे. तो मृत्यूपर्यंत राहणार आहे, मग तरीही मला नॉन हिंदू म्हणाल का? असा प्रतिप्रश्न सुशीलकुमार शिंदे यांनी प्रचार सभेत विचारला आहे. २० वर्षांपूर्वी जयपूर येथील काँग्रेसच्या चिंतन शिबिरातील वक्तव्यावरून आपल्याला टार्गेट करण्यात येत असल्याच्या आरोपाला उत्तर देताना शिंदे म्हणाले की , या शिबिरात भाषण करतानाशिंदे यांनी देशात भगव्या व हिंदू दहशतवादास राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप उत्तेजन देत आहे, अशा शब्दांत टीका केली होती. यावरुन भाजपने हा मुद्दा पुन्हा प्रचारात आणला आहे. त्याला सुशीलकुमार शिंदे यांनी उत्तर दिले आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी आज रामनवमीनिमित्त श्रीरामाचे दर्शन घेतले. यावेळी बाळीवेस येथील काळाराम मंदिरात सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते श्रीरामाची पूजा संपन्न झाली. सुशील कुमार शिंदे यांनी रामाची पूजा केल्यानंतर जय श्रीरामचा नारा दिला.

यावेळी बोलताना शिंदे पुढे म्हणाले की , भाजपाचे लोक प्रत्येक गोष्टीचे राजकारण करत निघाले आहेत. हिंदू दहशतवादाबाबत मी २० वर्षांपूर्वी बोललेलो होतो तेच ते घेऊन बसले आहेत. मी गृहमंत्रीपदाचे कर्तव्य करत होतो, त्यावेळी जे रेकॉर्डवर आले तेच मी सांगितले होते. त्या खुर्चीवर बसल्यानंतर तुम्हाला सत्यच सांगितले पाहिजे. त्या विधानावरून मला बदनाम करण्याचा प्रयत्न दिसतोय आणि आत्ताही तेच दिसतेय. मात्र या देशातील हिंदूंना माहिती आहे.

पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये सुशीलकुमार शिंदे हे केंद्रीय गृहमंत्री होते. यावेळी जानेवारी 2013 मध्ये जयपूर येथे काँग्रेसचे चिंतन शिबिर पार पडले. या शिबिरात भाषण करताना तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी भाजपवर टीका केली होती. यावेळी त्यांनी भाजप आणि संघपरिवाराच्या शिबिरांमध्ये दहशतवादाचे धडे दिले जातात. देशात भगव्या व हिंदू दहशतवादास राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपकडून चालना दिली जाते. त्याशिवाय भाजप आणि संघाच्या शिबिरांमध्ये दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिले जात असल्याचा आरोप केला होता.

Leave a Reply

आपलं सरकार

Click to listen highlighted text!