Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

ManojJarangePatilLive : मोठी बातमी : जरांगे पाटील यांचे ठरले , लोकसभा निवडणुकी विषयी जाहीर केली भूमिका, प्रकाश आंबेडकर यांच्याविषयी ते म्हणाले..

Spread the love

आंतरवाली सराटी : मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आज घोषित केल्याप्रमाणे आपली भूमिका जाहीर केली. आपली लढाई आरक्षणाची असून राजकारण आपले काम नाही. आपला कुणालाही पाठिंबा नाही आणि आपण कुणाचा प्रचारही करणार नाही. समाजाला ज योग्य वाटेल आणि मराठा आरक्षणाची ज भूमिका घेईल , सगे सोयऱ्याच्या जी आर ला जो सपोर्ट करील त्याला मतदान करा. मग तो कुणीही असो . समाज जी भूमिका घेईल ती  आपल्याला मान्य आहे. राजकारणासाठी मराठा समाजाची मी माती करणार नाही, असे जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. 

ठरल्याप्रमाणे आज सकाळी १० वाजल्यापासून  आंतरवाली सराटीत  लोकसभेच्या पार्श्वभूमीवर बैठक आयोजित करण्यात आली होती. ती पावणे सहापर्यंत चालू होती. प्रारंभी जरांगे पाटील यांनी गावा गावातून आलेल्या अहवालांचे वाचन केले आणि शेवटी उपस्थितांशी संवाद साधताना ते म्हणाले की, राजकारण करणे , अपक्ष उमेदवार उमेदवार करणे समाजाच्या हिताचे नाही त्यामुळे आपला समाज म्हणून कुणालाही पाठिंबा नाही, हे आता ठरले आहे.

मराठा समाजाचे आरक्षण आणि सगे सोयरे हा आपला विषय आहे. याबाबत जो आपल्याला पाठिंबा देईल  त्याच्या पाठीशी राहा. मग ज्याला पाडायचे आहे त्याला पाडा. मी त्याच्यात पडणार नाही मात्र ज्यांनी आपल्या महिलांना मारले त्यांना माफी नाही. त्यांचे वळ विसरू नका. लोकसभा निवडणुकीत आपण पडणार नाही पण या निवडणुकीत तुम्ही ज्यांना मदत कराल त्यांनी आपल्या विषयाला हात घातला नाही तर विधानसभा समोर आहे, हे लक्षात घ्या. त्यामुळे आम्हाला चिंता नाही.

प्रकाश आंबेडकर यांना मी आधीच सांगितले होते..

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी तुमचा पाठिंबा गृहीत धरून काम सुरू केले आहे. काही उमेदवारही जाहीर केले आहेत मग त्यांना तुमचा पाठिंबा नाही राहणार काय ? या प्रश्नावर जरांगे पाटील म्हणाले , प्रकाश आंबेडकर यांच्याविषयी मला आदर आहे. त्यांचा शब्द मी मानतो पण मी त्यांना आधीच सांगितले होते , ३० तारखेला माझा म्हणजे समाजाचा जो निर्णय होईल तो त्या दिवशी सांगेल. तो निर्णय आज सांगितला आहे. माझ्याकडे मुस्लिम , धनगर , बारा बलुतेदारांचे नेते येऊन गेले पण सर्वांना हेच सांगितले होते आणि हा समाजाचा निर्णय अंतिम आहे.

आणखी काय म्हणाले मनोज जरांगे पाटील?

आपण जी बैठक घेतली, त्यात काय करायचं हे ठरवलं होतं? मात्र, त्या दिवशी आपण निर्णय घेतला नाही. आपला करोडोनं मायबाप राज्यात आहे. निर्णय जो घ्यायचा तो ठरवूच. मात्र, गावखेड्यातल्या मराठ्यांना विचारनं गरजेचं होतं. त्यानुसार सगळ्यांनी काम सुरु केले. मात्र अहवाल वाचून जे लक्षात येतं त्याची चर्चा होणं गरजेची आहे. आपल्याला राजकारणापेक्षा आरक्षण महत्वाचं आहे. यात आरक्षण कुणीच घेईना उमेदवारच लई झालेत. त्या प्रक्रियेत गेल्याशिवाय न्याय मिळत नाही. मात्र, त्यापाई आरक्षणच कुणाच्या ध्यानात येईना. राजकारणापेक्षा रक्तात आरक्षण पाहिजे. मी त्याच दिवशी सांगितलं मला राजकारण नकोय म्हणून. मला माझ्या जातीचं वाटोळं काही बनायचं नाही, असं म्हणत जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!