नितीन गडकरी यांच्यासह २० उमेदवारांची भाजपाची दुसरी यादी जाहीर , महाराष्ट्रातून पाच जागी नवे उमेदवार

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. भाजपने बुधवारी संध्याकाळी भाजप उमेदवारांची दुसरी यादी जाहिर केली आहे. या यादीत महाराष्ट्रातील 20 उमेदवारांच्या नावांचा समावेश करण्यात आला आहे. या यादीत भाजपचे दिग्गज नेते नितीन गडकरी यांना नागपूरमधून उमेदवारी जाहिर करण्यात आला आहे. चंद्रपूरमधून सुधीर मुनगंटीवार यांनाही उमेदवारी देण्यात आली आहे. तर भाजपच्या काही नेत्यांची तिकीटे कापण्यात आली आहेत. पंकजा मुंडे यांनी बीडमधून लोकसभेच्या रिंगणात उतरवण्यात आलं आहे. मात्र, प्रीतम मुंडे यांचं तिकीट कापण्यात आले आहे.
भाजपने प्रीतम मुंडे, गोपाळ शेट्टी, मनोज कोटक यांच्यासह उन्मेश पाटील आणि संजय धोत्रे यांचं तिकीट कापले आहे. भाजपने महाराष्ट्रात 5 विद्यमान खासदारांचे तिकीट कापले आहे. यामध्ये, जळगावमध्ये स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली आणि विद्यमान खासदार उन्मेश पाटील यांचे तिकीट कापले आहे. याशिवाय संजय धोत्रे यांच्याऐवजी त्यांचा मुलगा अनुप धोत्रे यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे.
मनोज कोटक आणि गोपाळ शेट्टी या विद्यमान खासदारांना भाजपने दुसऱ्यांदा संधी न देता त्यांची तिकीटे कापली आहेत. मनोज कोटक यांच्या जागेवर ईशान्य मुंबईतून मीहिर कोटेचा यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर भाजपने उत्तर मुंबईतून गोपाळ शेट्टी यांच्या जागेवर पीयुष गोयल यांना लोकसभेचे तिकीट दिले आहे.
ना-ना करणाऱ्या दोघांना लोकसभेचं तिकीट
विशेष म्हणजे म्हणजे सुधीर मुनगंटीवार आणि पंकजा मुंडे यांनी लोकसभेवर जाण्यासाठी नकार नकार दिला होता. पंकजा मुंडे आणि सुधीर मुनगंटीवार यांना लोकसभेवर जाण्याची इच्छा नसल्याचे पक्षश्रेष्ठींना सांगितल्याची माहिती समोर आली होती. तर बीडमधून पंकजा मुंडे या प्रीतम मुंडेंना उमेदवारी मिळण्यासाठी आग्रही होत्या. मात्र, भाजपने ना-ना करणाऱ्या पंकजा मुंडे आणि सुधीर मुनगंटीवार यांनी उमेदवारी दिली आहे.
भाजपची यादी
1) चंद्रपूर- सुधीर मुनगंटीवार
2) रावेर – रक्षा खडसे
3) जालना- रावसाहेब दानवे
4) बीड -पंकजा मुंडे
5) पुणे- मुरलीधर मोहोळ
6) सांगली – संजयकाका पाटील
7) माढा- रणजीत निंबाळकर
8) धुळे – सुभाष भामरे
9) उत्तर मुंबई- पियुष गोयल
10) उत्तर पूर्व- मिहीर कोटेचा
11) नांदेड- प्रतापराव चिखलीकर
12) अहमदनगर- सुजय विखे पाटील
13) लातूर- सुधाकर श्रृंगारे
14) जळगाव- स्मिता वाघ
15) दिंडोरी- भारती पवार
16) भिवंडी- कपिल पाटील
17) वर्धा – रामदास तडस
18) नागपूर- नितीन गडकरी
19) अकोला- अनुप धोत्रे
20) नंदुरबार- डॉ. हिना गावित