Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

काँग्रेसच्या दुसऱ्या यादीत 43 उमेदवारांची नावे जाहीर… महाराष्ट्रातील सस्पेंस कायम 

Spread the love

केसी वेणुगोपाल यांनी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची दुसरी यादी जाहीर केली आहे. वेणुगोपाल यांनी राज्यातील उमेदवारांची नावे वाचून दाखवली. काँग्रेसने दुसऱ्या यादीत 43 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.

केसी वेणुगोपाल म्हणाले की, काँग्रेस खासदार गौरव गौगोई हे आसामच्या जोरहतमधून लढतील. नकुल नाथ मध्य प्रदेशच्या छिंदवाडामधून निवडणूक लढतील. राहुल कास्वा यांना राजस्थानच्या चुरु मतदारसंघातून संधी देण्यात आली आहे. वैभव गेहलोत हे जलोरेतून निवडणूक लढवतील.

वेणुगोपाल यांनी सांगितले की, दुसऱ्या यादीमध्ये एकूण ४३ उमेदवारांचा समावेश आहे. त्यातील १० खुल्या प्रवर्गातील, १३ ओबीसी उमेदवार, १० एससी उमेदवार, ९ एसटी उमेदवार तर एका मुस्लीम उमेदवाराचा समावेश आहे. काँग्रेसकडून पाच राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील उमेदवाराची नावे समोर आली आहेत.

महाराष्ट्रातील सस्पेंस कायम

राज्यात महाविकास आघाडीमधील जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. काही जागावर अद्याप तोडगा निघालेला नाही. शिवाय वंचित बहुजन आघाडीला मविआत घेण्यासाठी प्रयत्न सुरु आहे. सध्या आसाम, गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश या राज्यातील आणि दमन आणि दिव केंद्र शासित प्रदेशातील उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.

काँग्रेसने ३९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. यामध्ये काँग्रेसमधील प्रमुख नेत्यांची नावे होती. राहुल गांधी हे वायनाडमधून पुन्हा रिंगणात आहेत. शशी थरुर यांना तुरुवनंतपुरममधून पुन्हा संधी मिळाली आहे.

काँग्रेसच्या पहिल्या यादीमध्ये १५ उमेदवार खुल्या प्रवर्गातील आणि २४ अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि अल्पसंख्याक समूदायातून होते. दरम्यान, भाजपने पहिली १९५ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. भाजपकडूनही दुसरी यादी लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे.

Image

Image

 

 


दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी :  www.mahanayakonline.com

Join with Mahanayak Online WhatsApp Group: https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ

MahanayakOnline  www.mahanayakonline.com

For advertising call now: 9421379055 | 9028150765

आपलं सरकार

Click to listen highlighted text!