Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

कोर्टाच्या आदेशानुसार एसबीआयने इलेक्टोरल बाँडचा सर्व डेटा ECला पाठवला

Advertisements
Advertisements
Spread the love

नीवडणूक रोख्यांप्रकरणी सोमवार (11.03.2024) स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली होती. ज्यामध्ये राजकीय पक्षांना मिळालेल्या प्रत्येक निवडणूक रोख्याचा तपशील जाहीर करण्यास सांगितले होते. दरम्यान सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार एसबीआयने निवडणूक रोख्यांचा डेटा आज सुपूर्द करण्यात आला आहे.

Advertisements

स्टेट बँक ऑफ इंडियाने भारतीय निवडणूक आयोगाकडे निवडणूक रोख्यांचे तपशील सादर करण्यासाठी ३० जून २०२४ पर्यंत मुदत वाढवण्याची विनंती केली होती. त्याचवेळी सर्वोच्च न्यायालयाने कठोरता दाखवत SBI ने उद्याच (मंगळवार) बाँडशी संबंधित सर्व माहिती द्यावी आणि निवडणूक आयोगाने १२ मार्चपर्यंत ती प्रसिद्ध करावी, असे सांगितले होते.

Advertisements
Advertisements

३० जूनपर्यंत मुदत वाढवून देण्याची मागणी करणारा स्टेट बँक ऑफ इंडियाचा अर्ज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला होता. दरम्यान सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार एसबीआयने निवडणूक रोख्यांचा डेटा आज मंगळवार सायंकाळी ५ वाजून ३० मिनिटांनी दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने एसबीआयला इशारा दिला होता की जर बँकेने १२ मार्चपर्यंत बाँडचे तपशील निवडणूक आयोगाकडे न दिल्यास त्यांच्याविरुद्ध अवमानाची कारवाई केली जाईल.

सुप्रीम कोर्टाने निवडणूक रोखे घटनाबाह्य ठरवले आहेत. 15 फेब्रुवारी 2024 रोजी दिलेल्या ऐतिहासिक निकालात सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक रोखे योजना रद्द केली होती. त्यानंतर न्यायालयाने हे घटनाबाह्य ठरवले आणि EC निवडणूक आयोगाला देणगीदार, देणगी म्हणून दिलेली रक्कम आणि प्राप्तकर्ते १२ मार्चपर्यंत उघड करण्याचे आदेश दिले.

 

इलेक्टोरल बाँड प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा एसबीआयला दणका, उद्याच माहिती देण्याचे आदेश, निवडणूक आयोगालाही तंबी


दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी :  www.mahanayakonline.com

Join with Mahanayak Online WhatsApp Group: https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ

MahanayakOnline  www.mahanayakonline.com

For advertising call now: 9421379055 | 9028150765

आपलं सरकार

Click to listen highlighted text!