Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

महाविकास आघाडीतील मुंबई उत्तर-पश्चिम मतदारसंघातून उद्धव ठाकरेंनी आपला उमेदवार केला घोषित

Spread the love

बारामतीचा उमेदवार म्हणून सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या नावाची शरद पवारांकडून घोषणा करण्यात आली असतानाच, महाविकास आघाडीतील आणखी एका उमेदवाराच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.

मुंबई उत्तर-पश्चिम (वायव्य) लोकसभा मतदारसंघातून अमोल कीर्तिकर (Amol Kirtikar) आपला लोकसभेचा उमेदवार असणार असल्याची घोषणा उद्धव ठाकरे यांच्याकडून करण्यात आली आहे. जुहू येथील कार्यक्रमात बोलतांना उद्धव ठाकरेंनी ही घोषणा केली आहे.

मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघापैकी महाविकास आघाडीत कोणत्या पक्षाला किती मतदारसंघ मिळणार याबाबत अजूनही कोणती अधिकृत घोषणा झालेली नाही. अशात मुंबई वायव्य लोकसभा मतदारसंघ ठाकरेंच्या शिवसेनेला मिळणार असल्याची चर्चा सुरु असतानाच, स्वतः उद्धव ठाकरेंनी या मतदारसंघातील आपला उमेदवार घोषित करून टाकला आहे. ‘अमोल कीर्तिकर आपला लोकसभेचा उमेदवार आहे. त्यांना जिंकून द्यायचा आहे,’ असे उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना आवाहन केले आहे.

मुंबई उत्तर-पश्चिम 2019 चा निकाल? (Mumbai North West Lok Sabha Constituency Result 2019)

  • गजानन किर्तीकर (शिवसेना) : 570,063 (60.55 टक्के)

  • संजय निरुपम (काँग्रेस) : 3,09,73 (32.90 टक्के)

  • सुरेश शेट्टी (वंचित) 23,367 (2.49 टक्के)

  • नोटा : 18,225 (1.94 टक्के)

 

 


दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी :  www.mahanayakonline.com

Join with Mahanayak Online WhatsApp Group: https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ

MahanayakOnline  www.mahanayakonline.com

For advertising call now: 9421379055 | 9028150765

आपलं सरकार

Click to listen highlighted text!