अडल्ट फिल्म स्टार सोफिया लिओन अपार्टमेंटमध्ये मृतावस्थेत आढळली…

मियामी, फ्लोरिडा (US) ; अडल्ट फिल्म स्टार सोफिया लिओनीचे (Sophia Leone) वयाच्या 26 व्या वर्षी निधन झाले आहे. आठवडाभरापूर्वी ती तिच्या अपार्टमेंटमध्ये मृतावस्थेत आढळली होती. सोफियाच्या कुटुंबीयांनी फोनवर तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांना तिच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. सोफियाचे सावत्र वडील माईक रोमेरो यांनी सोफियाच्या निधनाच्या बातमीला दुजोरा दिला आहे. सोफियाच्या मृत्यूचा सध्या तपास सुरु आहे.
सोफिया काही दिवसांपासून तिच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सक्रिय होती, जिथे तिने काही पोस्ट अपलोड केल्या होत्या. सोफियाच्या सावत्र वडिलांनी सांगितले की, सोफियाच्या आई आणि कुटुंबाच्या वतीने, मला आमच्या प्रिय सोफियाच्या निधनाची बातमी तुम्हा सर्वांना सांगायची आहे. सोफियाच्या आकस्मिक मृत्यूने तिच्या कुटुंबावर आणि मित्रांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. सर्वांनाच खूप मोठा धक्का बसला आहे.”
“1 मार्च 2024 रोजी सोफियाचे कुटुंब तिच्यासोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होते पण त्याला ती प्रतिसाद देत नव्हती. सोफियाच्या मृत्यूचा तपास सध्या स्थानिक पोलिसांकडून करत आहेत. सोफिया ही एक चांगली मुलगी, बहीण, नात, भाची आणि मैत्रिणी होती. तिला प्राण्यांची आवड होती. तसेच तिला फिरायला आवडायचे.”, असंही सोफियाच्या सावत्र वडिलांनी सांगितले.
अडल्ट चित्रपटसृष्टीतील कलाकारांच्या मृत्यूंमध्ये वाढ
सोफिया लिओनीच्या मृत्यूनंतर सोशल मीडियावर चर्चेला उधाण आले आहे. अडल्ट चित्रपटसृष्टीतील स्त्रिया संशयास्पदपणे तरुण वयात का मरत आहेत? एखाद्या अडल्ट फिल्म स्टारने जगाचा निरोप घेण्याची गेल्या तीन महिन्यांतील ही तिसरी घटना आहे.
तीन महिन्यांच्या कालावधीत, याआधी कागनी लीने वयाच्या 36 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तिने आत्महत्या केली. तसेच जानेवारी महिन्यामध्ये जेसी झेन ही तिचा प्रियकर ब्रेट हसनम्युलरसह ओक्लाहोमामध्ये मृतावस्थेत आढळून आली होती.
दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी : www.mahanayakonline.com
Join with Mahanayak Online WhatsApp Group: https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ
MahanayakOnline www.mahanayakonline.com
For advertising call now: 9421379055 | 9028150765