मनोज जरांगे यांच्या अडचणीत वाढ; आतापर्यंत त्यांच्यावर पाच गुन्हे दाखल

ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी करणाऱ्या मनोज जरांगे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. जरंगे याच्यावर आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बीडमध्ये विना परवाना रॅली काढून जेसीबीने फुल उधळल्या प्रकरणी मनोज जरांगे पाटील आणि इतर 12 जणांवर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मागील दहा दिवसांत जरांगे यांच्यावर हा तिसरा गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांच्यावर आतापर्यंत एकूण पाच गुन्हे दाखल झाले आहेत.
मंगळवारी मनोज जरांगे यांनी बीड जिल्ह्याचा दौरा केला. दरम्यान त्यांच्या याच दौऱ्यात त्यांच्यावर पुन्हा एकदा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परवानगी नसतांना देखील रॅली काढून जीसीबीने धोकादायक पद्धतीने फुल उधळल्याप्रकरणी मनोज जरांगे यांच्यावर बीड शहरातील पेठ बीड पोलीस ठाणे आणि पिंपळनेर पोलीस ठाण्यात मनोज जरांगे यांच्यासह इतर 12 जणांवर देखील नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यावेळी त्याठिकाणी जेसीबीच्या माध्यमातून फुल उधळून स्वागत करण्यात आले. तर स्वागतासाठी मोठी गर्दी देखील जमवण्यात आली होती. हा गुन्हा धोकादायक पद्धतीने जेसीबीचा वापर केल्याप्रकरणी दाखल केल्याची माहिती बीडचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी दिली आहे.
आतापर्यंत पाच गुन्हे दाखल
मनोज जरांगे यांच्यावर मागील काही दिवसांपासून एकामागून एक गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. आतापर्यंत जरांगे यांच्यावर पाच गुन्हे दाखल झाले आहेत. ज्यात चार गुन्हे एकद्या बीड जिल्ह्यात दाखल करण्यात आले आहेत.
पहिला गुन्हा शिरूर पोलीस ठाणे, दुसरा अमळनेर, तिसरा गुन्हा पेठ बीड पोलीस ठाणे आणि चौथा गुन्हा पिंपळनेर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. तर, नांदेड जिल्ह्यात देखील एक गुन्हा जरांगे यांच्यावर दाखल करण्यात आला आहे.
रविवारी नांदेडमध्ये रात्री 11.30 वाजता चांदोजी पावडे मंगल कार्यलयात बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या बैठकीनंतर मनोज जरांगे यांची सभा झाली. त्यानंतर भाग्यनगर पोलीस स्टेशनमध्ये रात्री उशिरा सभा घेतल्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी : www.mahanayakonline.com
Join with Mahanayak Online WhatsApp Group: https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ
MahanayakOnline www.mahanayakonline.com
For advertising call now: 9421379055 | 9028150765