ढाका येथे सात मजली इमारतीला आग लागल्याने 43 जणांचा मृत्यू

बांगलादेशची राजधानी ढाका येथे एक भयानक दुर्घटना घडली आहे. येथील एका सात मजली इमारतीत गुरुवारी रात्री आग लागली, ती एवढी वेगाने पसरली की, लोकांना बाहेर पडण्याची संधीही मिळाली नाही आणि 43 जणांचा मृत्यू झाला. या अपघातात ४० हून अधिक लोक जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती बांगलादेशच्या आरोग्यमंत्र्यांनी दिली आहे.
ढाका मेडिकल कॉलेज आणि बर्न हॉस्पिटलमध्ये आतापर्यंत 43 जणांचा मृत्यू झाला आहे तर कमीत कमी 40 जणांवर उपचार सुरू असल्याची माहिती आरोग्यमंत्री सामंत लाल सेन यांनी दिली. काहीजण गंभीर स्वरुपात भाजले असल्याचेही ते म्हणाले या दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
लोकांना बचावाची संधीच मिळाली नाही
बांगलादेशची राजधानी ढाका येथे जेव्हा ही घटना घडली, तेव्हा मोठ्या संख्येने बिल्डिंगमध्ये लोक उपस्थित होते. आग वेगाने वरच्या तीन मजल्यांपर्यंत पसरली, यामुळे लोकांना स्वत:चा बचाव करण्याची संधीच मिळाली नाही. लोक घाबरले आणि सैरावैरा पळू लागले, यामुळे अधिकाधिक लोक आगीच्या विळख्यात सापडले.
बिर्याणी रेस्टॉरंटला लागली आग
बेली रोडजवळ सात मजली बिल्डिंगमध्ये एका प्रसिद्ध बिर्याणी रेस्टॉरंटला आग लागली अशी माहिती बांगलादेशचे अग्निशमन विभागाचे अधिकारी मोहम्मद शिहाब यांनी दिली. अंदाजे 9 वाजून 50 मिनिटांनी ही आग लागली. ही आग एवढ्या वेगाने पसरली की, वरील तीन मजल्यांपर्यंत ती पोहोचली.
आग एवढी भयानक होती की, लोकांना स्वत:ला वाचविण्यासाठी पुरेसा वेळही मिळाला नाही आणि काही लोक या आगीच्या विळख्यात सापडले. जवळपास 2 तासांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले. या भयानक दुर्घटनेत 75 लोकांना वाचविण्यात यश आले असल्याची माहिती अग्निशमन विभागाच्या एका अधिकाऱ्याने दिली.
दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी : www.mahanayakonline.com
Join with Mahanayak Online WhatsApp Group: https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ
MahanayakOnline www.mahanayakonline.com
For advertising call now: 9421379055 | 9028150765