Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

शरद पवार गट ‘तुतारी’ चिन्हावर लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकणार

Spread the love

शरद पवार यांच्या गटाला निवडणूक आयोगाकडून तुतारी चिन्ह मिळाले आहे. निवडणूक आयोगाने अजित पवार गटाला राष्ट्रवादीचे नाव आणि पक्षाचे निवडणूक चिन्ह घड्याळ दिल्यानंतर शरद पवार गटाने हालचाली सुरू केल्या.  त्यांनी निवडणूक आयोगाकडे वटवृक्ष, कप – बक्षी आणि शिट्टी हे तीन चिन्हांचा प्रस्ताव पाठवला होता.

मात्र निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला तुरीचे निवडणूक चिन्ह दिले आहे. दरम्यान, ‘तुतारी’ निवडणूक चिन्ह मिळाल्यानंतर शरदचंद्र पवार यांचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचा रायगडमध्ये भव्य लॉन्चिंग सोहळा होणार आहे. या भव्य कार्यक्रमातून ते लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे. पक्षाचे नवे निवडणूक चिन्ह आणि नाव मिळाल्यानंतर शरद पवार लोकसभा निवडणुकीसाठी रणशिंग फुंकणार आहेत.

रायगडमध्ये तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावर शरद पवारांचा पक्ष लोकसभा निवडणुकांसाठी रणशिंग फुंकण्यात येणार आहे. पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यासह सर्व ज्येष्ठ नेते शनिवारी रायगडमध्ये उपस्थित राहणार असल्याची वृत्त आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार असे नाव दिले होते. त्यानंतर आता पक्षाला तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह बहाल करण्यात आले आहे.

राष्ट्रवादी पक्ष आणि निवडणूक चिन्हाचा वाद सर्वोच्च न्यायालयात

यापूर्वी केंद्रीय निवडणूक आयोगाने अजित पवार यांना राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह दिले होते. याविरोधात शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. आता सर्वोच्च न्यायालय याबाबत पुढील निर्देश देत नाही तोपर्यंततुतारी वाजवणारा माणूस हेच ​​शरद पवार गटाचे पक्ष चिन्ह राहणार आहे. शरद पवार गटाला पुढची निवडणूक तुतारी वाजवणारा माणूस या निवडणूक चिन्हावर लढवावी लागणार आहे.

 

 


दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी :  www.mahanayakonline.com

Join with Mahanayak Online WhatsApp Group: https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ

MahanayakOnline  www.mahanayakonline.com

For advertising call now: 9421379055 | 9028150765

आपलं सरकार

Click to listen highlighted text!