DelhiFireNewsUpdate : दिल्लीतील अलीपूर येथील पेंट फॅक्टरीत भीषण आग , ११ जणांचा होरपळून मृत्यू

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत पुन्हा एकदा आगीची भीषण घटना समोर आली आहे. दिल्लीतील अलीपूर येथील पेंट फॅक्टरीत भीषण आग लागली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, येथे आग लागून ११ जणांचा होरपळून मृत्यू झाला असून ४ जण जखमी झाले आहेत. अग्निशमन दलाच्या २२ गाड्यांनी आग आटोक्यात आणली आहे.
मृतांपैकी बहुतेकांची ओळख पटवणे कठीण आहे. त्यांचे मृतदेह पूर्णपणे जळाले आहेत. मृत हे कारखान्यातच मजूर असल्याचे सांगण्यात येत आहे. आग लागली तेव्हा ते विझवण्यात व्यस्त होते. दरम्यान, रंग तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या केमिकलच्या ड्रमचा स्फोट झाला. कारखान्याला लागलेल्या भीषण आगीच्या घटनेत मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारखान्यात शोधमोहीम सुरू आहे.
दिल्लीतील अलीपूर हा दाट लोकवस्तीचा परिसर आहे. या गजबजलेल्या परिसरात रंगाचा कारखाना सुरू होता. गुरुवारी सायंकाळी येथे आग लागली आणि केमिकलमुळे आग वाढतच गेली आणि पसरत गेली. त्यामुळे कारखान्यात उपस्थित लोकांचा भडका उडाला. याआधी तीन जणांचा मृत्यू झाल्याची बातमी आली होती, मात्र रात्री उशिरा आलेल्या अपडेटमध्ये ११ जणांचा दगावल्याने मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. आगीमुळे परिसरात एकच गोंधळ उडाला.
अग्निशमन दलाच्या २२ गाड्यांनी आग विझवली
माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या २२ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आग आटोक्यात आणली. रात्री उशिरापर्यंत जळालेल्यांची ओळख पटू शकली नाही. आगीत भाजलेल्या काही लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. काहींचा जागीच मृत्यू झाला. आग कशी लागली याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
दिल्लीतील अलीपूर हा दाट लोकवस्तीचा परिसर आहे. या गजबजलेल्या परिसरात रंगाचा कारखाना सुरू होता. गुरुवारी सायंकाळी येथे आग लागली आणि केमिकलमुळे आग वाढतच गेली आणि पसरत गेली. त्यामुळे कारखान्यात उपस्थित लोकांचा भडका उडाला.
याआधी तीन जणांचा मृत्यू झाल्याची बातमी आली होती, मात्र रात्री उशिरा आलेल्या अपडेटमध्ये ११ जणांचा दगावल्याने मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. आगीमुळे परिसरात एकच गोंधळ उडाला. दिल्ली अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मृतांना बाबू जगजीवन राम रुग्णालयात नेण्यात आले आहे. तर, चार जखमींना राजा हरिश्चंद्र रुग्णालयात नेण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही.
आजूबाजूची चार घरे आगीच्या भक्ष्यस्थानी
ही आग इतकी भीषण होती की, आजूबाजूची चार घरे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. गुरुवारी संध्याकाळच्या सुमारास ही आग लागली आणि रात्री उशिरापर्यंत आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू होते. अखेर, शुक्रवारी सकाळी आग आटोक्यात आणण्यात यश मिळाले.
दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी : www.mahanayakonline.com
Join with Mahanayak Online WhatsApp Group: https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ
MahanayakOnline www.mahanayakonline.com
For advertising call now: 9421379055 | 9028150765