Haldwani violence : हल्दवानी हिंसाचारानंतर सुमारे ५०० कुटुंब शहर सोडून निघून गेले…

8 फेब्रुवारी रोजी हल्दवानी येथील बनभूलपुरा भागात अतिक्रमण काढण्यासाठी गेलेल्या प्रशासन आणि पोलिसांवर दगडफेक करण्यात आली आणि गाड्या जाळण्यात आल्या. या हिंसाचारात महापालिका आणि सरकारी मालमत्तेचे मोठे नुकसान झाले.
त्याची चौकशी केल्यानंतर पालिकेने मुख्य आरोपी अब्दुल मौलिकला नुकसान भरपाई वसुलीसाठी नोटीस बजावली आहे. पालिकेने आरोपींना १५ फेब्रुवारीपर्यंत अडीच कोटी रुपयांची भरपाई देण्यास सांगितले आहे. विहित मुदतीत नुकसान भरपाई न दिल्यास कायदेशीर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.
हल्दवानी येथील हिंसाचारानंतर चार दिवसांनी मुस्लिम कुटुंबीयांनी जिल्ह्याच्या बाहेर सुरक्षित भागात पलायन करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. दरम्यान, सुमारे ५०० कुटुंब शहर सोडून निघून गेले आहेत. काही कुटुंबांनी पायीच सर्व सामान घेऊन वाट धरली असल्याचे वृत्त आहे. सध्या या भागात संचारबंदी असल्याने कोणतीही वाहने येथे ये-जा करत नाहीत.
या हिंसाचाराप्रकरणी आतापर्यंत ३० जणांना अटक करण्यात आली असून काही ठिकाणी संचारबंदी शिथिलही करण्यात आली आहे. मात्र बनभूलपुरा भागात अजूनही संचारबंदी कायम आहे. येथील लोकांना घरातच राहण्यास बजावण्यात आले आहे. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांना कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
प्रशासनाने या भागातील सर्व ये-जा करण्याचे मार्ग सील केले आहेत. येथून लोक बाहेरही जाऊ शकत नाहीत किंवा आतही येऊ शकत नाहीत. दंगलखोरही या मार्गाने पळून जाण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी हे पाऊल उचलले आहे.
‘मशिद हटवण्याचा निर्णय घिसाडघाईने’
जमियत उलेमा-ए-हिंदच्या शिष्टमंडळाने हल्दवानी येथे जाऊन एसडीएमसोबत बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी प्रशासनाशी चर्चा केली. तेव्हा जमियतचे सरचिटणीस अब्दुल रझीक यांनी सांगितले होते की, मशीद पाडण्याच्या निर्णयामुळे परिसरात तणाव निर्माण झाला आहे.
Haldwani violence: समाजकंटकांनी केली जाळपोळ 6 ठार, 300 जखमी; उत्तराखंड हाय अलर्टवर
दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी : www.mahanayakonline.com
Join with Mahanayak Online WhatsApp Group: https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ
MahanayakOnline www.mahanayakonline.com
For advertising call now: 9421379055 | 9028150765