Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

महाराष्ट्रात काँग्रेसला मोठा धक्का अशोक चव्हाण यांनी दिला पक्षाचा राजीनामा

Spread the love

महाराष्ट्रात काँग्रेसला मोठा धक्का, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. चव्हाण हे पक्षावर नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे.

तसेच त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेऊन चर्चाही केली. या दोघांमध्य झालेल्या चर्चेचा तपशील अद्याप उघड झालेला नाही. परंतु, या सगळ्या घडामोडी पाहता अशोक चव्हाण भाजपच्या वाटेवर जाणार असल्याचे दिसत आहे.

या सगळ्याबाबत अशोक चव्हाण यांच्याकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. राहुल नार्वेकर यांचा रविवारी वाढदिवस होता. त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मी नार्वेकरांना भेटलो, असे अशोक चव्हाणांकडून सांगण्यात आले.

मात्र, आगामी राज्यसभा निवडणुकीच्या तोंडावर अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करु शकतात, असे वृत्त आहे. भाजपकडून त्यांना राज्यसभेची उमेदवारी दिली जाऊ शकते. नांदेडच्या राजकीय वर्तुळातही अशोक चव्हाण मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची देखील चर्चा आहे.

अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी ‘भावी खासदार’ असा उल्लेख करत अशोक चव्हाणांचे स्टेटस ठेवले आहेत. दरम्यान, भाजपचे प्रमुख नेतेही पक्षाच्या मुंबई प्रदेश कार्यालयात दाखल झाले असल्याचे वृत्त आहे.


दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी :  www.mahanayakonline.com

Join with Mahanayak Online WhatsApp Group: https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ

MahanayakOnline  www.mahanayakonline.com

For advertising call now: 9421379055 | 9028150765

आपलं सरकार

Click to listen highlighted text!