Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

शरद पवार गटाचे नवे नाव… नॅशनलिस्ट कॉंग्रेस पार्टी शरदचंद्र पवार

Spread the love

मुळ चिन्ह आणि पक्षाचे नाव अजित पवार गटाला दिल्या नंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नावावर आणि चिन्हावर महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा दिलासा या निर्णयातून मिळाला असून पक्षाचे नाव आणि चिन्ह त्यांना मिळाले होते. दरम्यान आज शरद पवार गटाकडून निवडणूक आयोगात तीन नावांचा प्रस्ताव पाठवण्यात आला. त्यातील एक नाव आता निवडण्यात आले आहे.

दरम्यान, शरद पवार यांच्या गटाला आगामी राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाला तीन नावांचा आणि चिन्हांचा प्रस्ताव पाठवण्याचा आदेश देण्यात आला होता. यानुसार, निवडणूक आयोगाच्या या आदेशानुसार शरद पवार गटाकडून निवडणूक आयोगात तीन नावांचा प्रस्ताव पाठवण्यात आला. त्यातील एक नाव आता निवडण्यात आले आहे.

शरद पवार गटाकडून निवडणूक आयोगाला तीन नावाचा प्रस्ताव देण्यात आला आहे. यातील पहिले नाव नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी- शरद पवार, दुसरे नाव नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी- शरदचंद्र पवार, तिसरे नाव नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी- शरदराव पवार असे प्रस्ताव देण्यात आले होते.

त्यामुळे आता यापैकी नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी- शरदचंद्र पवार हे नाव निवडणूक आयोगाने निश्चित केले आहे. हे नाव फक्त २७ फेब्रुवारीपर्यंतच पक्षासोबत राहील. म्हणजेच राज्यसभेच्या निवडणुकीपर्यंत हे नाव राहणार आहे. त्यानंतर पुन्हा एकदा शरद पवार गटाला नव्याने नावे पाठवावी लागतील.

दरम्यान, शरद पवार गटाकडून निवडणूक आयोगाला तीन नावांचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. मात्र, अद्याप त्यांच्याकडून तीन चिन्हांचा प्रस्ताव पाठवण्यात आलेला नाही. राज्यसभेच्या निवडणुकीला चिन्हाचा वापर होत नाही. त्यामुळे शरद पवार गटाकडून राज्यसभा निवडणुकीसाठी चिन्हाचा प्रस्ताव पाठवण्यात आलेला नाही, असे म्हटले जात आहे. त्यांना मिळत असलेले नावही तात्पुरत असणार आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निकालानंतर दिल्लीत शरद पवार गटाकडून शक्तिप्रदर्शन करण्यात आले, दिल्लीत ‘आमचा पक्ष, आमचं चिन्ह’ अशा अशयाची बॅनरबाजी करण्यात आली. तर, दुसरीकडे अजित पवार गटाकडून निकालानंतर आनंद व्यक्त करण्यात आला आहे.

 

 


दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी :  www.mahanayakonline.com

Join with Mahanayak Online WhatsApp Group: https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ

MahanayakOnline  www.mahanayakonline.com

For advertising call now: 9421379055 | 9028150765

आपलं सरकार

Click to listen highlighted text!