Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

मध्यप्रदेशमध्ये फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट 11 ठार 100 हुन अधिक जखमी

Spread the love

मध्य प्रदेशमधून दुर्घटनेची मोठी बातमी समोर आली आहे. हरदा जिल्ह्यातील एका फटाका कंपनीमध्ये भीषण स्फोट झाला असून या स्फोटामध्ये 11 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 100 हुन अधिक लोक जखमी झाले आहेत. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या आहेत, आग विझवण्याचे काम सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशमधील हरदा जिल्ह्यातील मगरधा रोडवर असलेल्या फटाका फॅक्टरीमध्ये भीषण स्फोट झाला आहे. हा स्फोट इतका भीषण होता की, दूरपर्यंत धुराचे लोळ दिसत होते. या घटनेत 11 जणांचा मृत्यू झाला असून 100 पेक्षा अधिक लोक जखमी झाले आहेत.

अचानक झालेल्या या स्फोटामुळे भिंतीना सुद्धा तडे गेले आहे. जखमींना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काही जखमींना खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. रुग्णालयामध्ये 200 बर्न युनिट बेड तयार करण्यात आले आहे.

इंदुरहून 20 आयसीयू रुग्णवाहिका रवाना झाल्या आहेत. तसेच एमवाय हॉस्पिटलमध्ये बर्न यूनिट तयार करण्यात आले आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 6 गाड्या, रेस्क्यू करण्यासाठी 19 एसडीआरएफ जवानांची टीम रवाना झाली आहे.

दरम्यान, या दुर्दैवी घटनेबद्दल मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी दु:ख व्यक्त केले आहे. तसेच या घटनेबद्दल तातडीने बैठक बोलावण्यात आली आहे. मंत्री प्रद्युम्न सिंह तौमर, उदय प्रताप सिंह यांच्यासह इतर मंत्री आणि अधिकारी हेलिकॉप्टरने घटनास्थळाकडे रवाना झाले आहेत.

 

 


दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी :  www.mahanayakonline.com

Join with Mahanayak Online WhatsApp Group: https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ

MahanayakOnline  www.mahanayakonline.com

For advertising call now: 9421379055 | 9028150765

आपलं सरकार

Click to listen highlighted text!