PrakashAmbedkarNewsUpdate : महाविकास आघाडीच्या बैठकीत प्रकाश आंबेडकरांचे स्वागत, जागा वाटपावरून बैठकीत चर्चा…

मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज (२ फेब्रुवारी) महाविकास आघाडीची महत्वाची बैठक होत असून या बैठकीला वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर सुद्धा उपस्थित आहेत. प्रारंभी महाविकास आघाडीच्या वतीने अशोक चव्हाण , संजय राऊत, बाळासाहेब थोरात, नाना पटोले , वर्ष गायकवाड , जयंत पाटील , जितेंद्र आव्हाड यांनी त्यांचे स्वागत केले.
दरम्यान आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आज मुंबईत महाविकास आघाडीची बैठक सुरू असून या बैठकीला वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर सुद्धा उपस्थित असल्याची माहिती काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन दिली आहे.
तसेच, सत्ताधाऱ्यांविरोधात सुरू असलेल्या लढ्याला मजबूत करण्यासाठी महाविकास आघाडीत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचे स्वागत करतो, अशी प्रतिक्रिया विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.
वंचित बहुजन आघाडीला अखेर महाविकास आघाडीत स्थान देण्यात आले आहे. वंचितला आघाडीत सामील करून घेण्याबाबत शिवसेना, राष्ट्रवादी आधीच सकारात्मक होते, गेल्या मंगळवारच्या बैठकीत काँग्रेसकडूनही याला संमती मिळाल्यानंतर याविषयीचे पत्र वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना पाठविण्यात आले आहे. वंचितने सामील व्हावे यासाठी तिन्ही पक्षांचे एकमत झाले असून त्यानुसार महाविकास आघाडीत समावेश करण्यात येत असल्याचे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.
एका पत्रकार परिषदेत बोलताना वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले होते की , अधिकृत पत्राबद्दल त्यांचा आग्रह असून मानापमानापेक्षा भाजप आणि संघाचा पराभव करण्यासाठी ते महाविकास आघाडी म्हणजेच इंडिया आघाडीसोबत जाण्यास इच्छुक आहेत. आता जागावाटपारून त्यांच्यात आणि महाविकास आघाडीत काय निर्णय होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी : www.mahanayakonline.com
Join with Mahanayak Online WhatsApp Group: https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ
MahanayakOnline www.mahanayakonline.com
For advertising call now: 9421379055 | 9028150765